Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री

Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री

Stock Market Today: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेची एन्ट्री.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 09:54 IST2025-06-23T09:54:02+5:302025-06-23T09:54:02+5:30

Stock Market Today: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेची एन्ट्री.

Stock Market Today Fears of Iran Israel war Stock market opens down 534 points big sell off in IT realty | Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री

Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री

Stock Market Today: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेची एन्ट्री. यामुळे आज सेन्सेक्समध्ये घसरणीसह व्यवहार सुरू झाला. सेन्सेक्स ७०४ अंकांनी घसरून ८१,७०४ वर उघडला. निफ्टी १७३ अंकांनी घसरुन २४,९३९ वर उघडला. बँक निफ्टी ४२० अंकांनी घसरून ५५,८३२ वर उघडला. रुपया ८६.५९ च्या तुलनेत ८६.७६/ डॉलर्सवर उघडला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर, आज आयटी आणि रिअल्टी क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली. दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे १ टक्क्यांनी घसरण दिसून आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आज कोणत्याही क्षेत्रात वाढ दिसून आली नाही.

आज कामकाजादरम्यान बीईएल, एअरटेल आणि ट्रेंटच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर एशियन पेंट्स, इटर्नल, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.

इराण-इस्रायल युद्धामुळे भीती

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धानं मोठं वळण घेतलं आहे. अमेरिकेनं थेट या संघर्षात उडी घेतली आहे आणि इराणच्या तीन प्रमुख अणू तळांवर हल्ला केला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा हल्ला आवश्यक होता असं अमेरिकन प्रशासनाचं म्हणणं आहे. जर इराणनं अजूनही माघार घेतली नाही तर पुढचा हल्ला आणखी मोठा असेल, असं मराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनाद्वारे म्हटलं.

या हल्ल्यानंतर, इराणने ताबडतोब प्रतिक्रिया दिली आणि इशारा दिला की याचा परिणाम जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. इराणी संसदेनं धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या स्ट्रेट ऑफ हॉरमुज बंद करण्यास मान्यता दिली आहे. आता अंतिम निर्णय देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून घेतला जाईल.

Web Title: Stock Market Today Fears of Iran Israel war Stock market opens down 534 points big sell off in IT realty