लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सप्टेंबर महिन्यात भारताची स्पेनला झालेली पेट्रोलियम उत्पादने निर्यात ४६,००० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे स्पेनला होणारी भारताची एकूण निर्यात १५१ टक्क्यांनी वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ च्या सप्टेंबरमध्ये भारताने स्पेनला केवळ १.१ दशलक्ष डॉलर्सची पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली होती, ती यंदाच्या सप्टेंबरमध्ये वाढून ५१३.७ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. स्पेनकडे थेट निर्यातीमुळे नेदरलँड्ससारख्या पारंपरिक खरेदीदार देशाकडे भारताने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.
रशियन तेलाच्या किमतीत झाली मोठी घसरण
- अमेरिकेच्या नवीन निर्बंधांमुळे रशियन कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली असून, हे दर गेल्या एका वर्षातील सर्वात कमी पातळीवर पोहोचले आहेत.
- ट्रम्प यांनी लादलेल्या निर्बंधांनंतर रशियाला तेल निर्यातीत मोठा फटका बसला आहे. या घसरणीमुळे रशियन तेलावर दिल्या जाणाऱ्या सवलती वाढल्या आहेत.
- ते ब्रेंट क्रूडच्या तुलनेत प्रतिबॅरल ८ ते १० डॉलरच्या स्वस्त दराने विकले जात आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये रशियाच्या तेल उत्पन्नात २७% नी घसरण झाली आहे.
- घट युरोपीय महासंघाला होणाऱ्या भारताच्या पेट्रोलियम उत्पादन निर्यातीत झाली. ही निर्यात १,४७३.२ दशलक्ष डॉलरवरून १,४२०.१ वर आली.
