lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market: असे बना शेअर बाजाराचे बादशहा... काही उत्तम कंपन्यांमध्ये पैसा गुंतवा

Share Market: असे बना शेअर बाजाराचे बादशहा... काही उत्तम कंपन्यांमध्ये पैसा गुंतवा

बाजारात अनेक कंपन्या लिस्ट आहेत. याचा अर्थ सगळ्याच उत्तम आहेत, असे नाही. मग कोणत्या कंपन्या चांगल्या...

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 12, 2022 01:11 PM2022-12-12T13:11:41+5:302022-12-12T13:15:53+5:30

बाजारात अनेक कंपन्या लिस्ट आहेत. याचा अर्थ सगळ्याच उत्तम आहेत, असे नाही. मग कोणत्या कंपन्या चांगल्या...

Share market tips: to Become a share market king, Invest your money in some of the valuable companies, | Share Market: असे बना शेअर बाजाराचे बादशहा... काही उत्तम कंपन्यांमध्ये पैसा गुंतवा

Share Market: असे बना शेअर बाजाराचे बादशहा... काही उत्तम कंपन्यांमध्ये पैसा गुंतवा

शेअर बाजारात रक्कम गुंतवीत असताना आपली गुंतवणूक दिग्गज कंपनीसोबत आहे ना याची खात्री अवश्य करावी. बाजारात अनेक कंपन्या लिस्ट आहेत. याचा अर्थ सगळ्याच उत्तम आहेत, असे नाही. जंगलात जसा सिंह राजा म्हणून राहतो तशा काही कंपन्या आहेत ज्या बाजारात राजा म्हणून राहतात आणि जगतात. कारण, त्या अशा व्यवसायात असतात की  ज्यास मरण नसते आणि ज्याचे भविष्यही उज्ज्वल असते. अशा कंपन्यांचे बिझनेस मॉडेलही उत्तम असते आणि त्यात वेळोवेळी व्यावसायिक सुधारणा होत असते. या कंपन्या शेअर होल्डर्स ना उत्तम रिटर्न्स देण्याची क्षमता राखत असतात. तुमची वर्षानुवर्षे अशा कंपन्यांबरोबरची साथ आपणासही गुंतवणुकीचा ‘राजा’ बनवीत असते. आज इंग्रजी अक्षर ‘के’ आणि ‘एल’पासून सुरू होणाऱ्या काही उत्तम कंपन्यांविषयी... 

  • कोटक महिंद्रा बँक  
  • (KOTAK BANK) 
  • खासगी क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक. रिटेल आणि होलसेल बँकिंग, सर्व प्रकारची कर्जे देणे, विविध इंश्युरन्स प्लॅन्स देणे, शेअर ट्रेडिंग ॲंड डिमॅट अकाउंट ब्रोकिंग, असेट मॅनेजमेंट इत्यादी हे या बँकेचे प्रमुख व्यवसाय आहेत. देशभर या बँकेच्या अनेक शाखा आहेत.  
  • फेस व्हॅल्यू : रु. ५/- प्रतिशेअर
  • सध्याचा भाव : रु. १,८८८/- प्रतिशेअर
  • मार्केट कॅप : रु. तीन लाख ७५ हजार कोटी
  • भाव पातळी : वार्षिक हाय रु.१,९९८/- आणि  
  • लो रु. १,६३१ /-
  • बोनस शेअर्स : सन १९९४ ते २०१५ या दरम्यान चार वेळा दिले आहेत.
  • शेअर स्प्लिट :  सन २०१० मध्ये १:२ या प्रमाणात
  • डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
  • रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तब्बल आठ पट रिटर्न्स मिळाले आहेत.
  • भविष्यात संधी : उत्तम आहे.  सध्या बँक निफ्टी सर्वोच्च पातळीवर ट्रेड करीत आहे. यामुळे येणाऱ्या काळात करेक्शन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्याने एंट्री करायची असल्यास यावर लक्ष अवश्य ठेवावे.
     

    एल अँड टी माईंड 
    ट्री लि.  (LTIM)    
    लार्सन अँड टुब्रो ग्रुपमधील आयटी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी. नुकतेच एल अँड टी इन्फोटेक आणि माईंड ट्री या दोनही  आयटी कंपन्या एकत्र आल्या असून कंपनीचे नवीन नाव एल अँड टी माईंड ट्री लिमिटेड असे झाले आहे. ही कंपनी भारत, अमेरिका, युरोप, आशिया प्रांतात अनेक देशांत आयटी सर्व्हिस प्रदान करते.

  • फेस व्हॅल्यू : रु. १/- प्रतिशेअर
  • सध्याचा भाव : रु. ४,४०२/- प्रतिशेअर
  • मार्केट कॅप : रु. एक लाख ३५ हजार कोटी 
  • भाव पातळी  : वार्षिक हाय रु ७,५८८/- आणि 
  • लो - ३,७२१ /-
  • बोनस / शेअर्स स्प्लिट : नाही.  कारण, दोनही कंपन्या नुकत्याच एकत्र आल्या आहेत. पूर्वी एल अँड टी इन्फोटेकने बोनस शेअर दिले होते.
  • रिटर्न्स : दोनही कंपन्यांनी पूर्वी भागधारकांना  उत्तम रिटर्न्स दिले आहेत.
  • डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
  • भविष्यात संधी : उत्तम राहील. सध्या आयटी क्षेत्र दबावात आहे. या कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची संधी घेऊन भविष्यात हा शेअर अनेक पट रिटर्न्स देण्याची क्षमता राखतो.
     

    एलआयसी (LICI) 
    इन्शुरन्स म्हटले की आपल्या समोर नाव येते ते एलआयसीचे. भारतातील व्यतिगत सर्व  प्रकारच्या इन्शुरन्ससाठी आणि पेन्शन फंडसाठी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही एक अग्रगण्य संस्था आहे. 

  • फेस व्हॅल्यू : रु. १०/-
  • सध्याचा भाव : रु. ६७२/-
  • मार्केट कॅप :  चार लाख २० हजार कोटी रुपये.
  • भाव पातळी : वार्षिक हाय रु. ९५९/- आणि  
  • लो - रु. ५८८/-
  • बोनस शेअर्स : अद्याप नाही
  • शेअर स्प्लिट : अद्याप नाही
  • रिटर्न्स : लिस्ट झाल्यापासून निगेटिव्ह आहेत.
  • डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
  • भविष्यात संधी : या वर्षी मे महिन्यात एलआयसीचा आयपीओ लिस्ट झाला आणि संस्थात्मक आणि सर्वसाधारण गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची एक संधी मिळाली. शेअर लिस्ट झाल्यावर हा शेअर सध्या दबावात आहे; परंतु, भविष्यात दीर्घकालीन गुंतवणुकीतून उत्तम परतावा देऊ शकतो.
     
  • L गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची 
    नावे :    एल अँड टी लि., एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्विस, लुपिन लि. इत्यादी चांगल्या कंपन्या आहेत.

    टीप : हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.

Web Title: Share market tips: to Become a share market king, Invest your money in some of the valuable companies,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.