lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानी समूहावर SBI च्या कर्जाचा हिमालय, बँकेनं स्वतःच सांगितलं, किती आहे ओझं

अदानी समूहावर SBI च्या कर्जाचा हिमालय, बँकेनं स्वतःच सांगितलं, किती आहे ओझं

खरे तर, अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त कोसळले आहेत. यामुळे ज्या बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे, त्याच्या संदर्भातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:08 PM2023-02-02T17:08:42+5:302023-02-02T17:09:56+5:30

खरे तर, अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त कोसळले आहेत. यामुळे ज्या बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे, त्याच्या संदर्भातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

sbi has above 2 billion dollar loans gautam adani group bank said how much know about detail | अदानी समूहावर SBI च्या कर्जाचा हिमालय, बँकेनं स्वतःच सांगितलं, किती आहे ओझं

अदानी समूहावर SBI च्या कर्जाचा हिमालय, बँकेनं स्वतःच सांगितलं, किती आहे ओझं

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या अहवालानंतर, गौतम अदानी समूहाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. या अहवालात अदानी समूहावरूल कर्जासंदर्भातही मोठे सवाल खडे करण्यात आले आहेत. यानंतर, अदानी समूहाच्या कंपन्यांना 2.6 बिलियन डॉलर अर्थात 21,000 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले असल्याचे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने म्हटले आहे. एसबीआयने दिलेल्या कर्जात परदेशी युनिट्सच्या $200 मिलियनचाही समावेश आहे.

ब्ल्युमबर्गच्या अहवालानुसार, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले, अदानी समूहाच्या कंपन्या लोनची परत फेड करत आहेत. बँकेने आतापर्यंत जे काही उधार दिले आहेत, त्यासंदर्भात कोणतीही अडचण दिसत नाही. यातच, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांकडून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या जोखमीचे विवरण आणि कर्जाची संपूर्ण माहिती मागवली आहे.

PNB चे किती कर्ज? -
पंजाब नॅशनल बँकेने अदानी समूहाला जवळपास 7,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यंपैकी 2,500 कोटी रुपये विमानतळ व्यवसायाशी संबंधित आहेत.

...म्हणून भासली सांगायची गरज - 
खरे तर, अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त कोसळले आहेत. यामुळे ज्या बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे, त्याच्या संदर्भातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच, अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप वारंवार फेटाळले आहेत आणि अहवाल ‘बनावट’ असल्याचे म्हणत, कायदेशीर कारवाईचाही इशाराही दिला आहे.

Web Title: sbi has above 2 billion dollar loans gautam adani group bank said how much know about detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.