lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' बँकेच्या कार्डवर मिळतेय 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत मिळवू शकता फायदा

'या' बँकेच्या कार्डवर मिळतेय 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत मिळवू शकता फायदा

SBI bank : एसबीआयने ही ऑफर याच महिन्यात सुरु केली असून 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.

By ravalnath.patil | Published: December 6, 2020 04:37 PM2020-12-06T16:37:08+5:302020-12-06T16:39:10+5:30

SBI bank : एसबीआयने ही ऑफर याच महिन्यात सुरु केली असून 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.

SBI bank card is getting 5 cashback, you can avail till december 31 | 'या' बँकेच्या कार्डवर मिळतेय 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत मिळवू शकता फायदा

'या' बँकेच्या कार्डवर मिळतेय 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत मिळवू शकता फायदा

Highlightsएसबीआयच्या कॅशबॅक ऑफरसाठी तुम्हाला SBI Card Website/Mobile App वर ऑटोपे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

नवी दिल्ली : ज्यावेळी तुम्ही कॅशलेस ट्रांजक्शन केल्यानतंर कॅशबॅक ऑफर मिळावी, यासाठी प्रयत्न करत असाल, तर अशावेळी एसबीआयने (SBI) त्यांच्या कार्डवरून पेमेंट केल्यानंतर कॅशबॅकची ऑफर दिली आहे. जर तुम्ही एसबीआयच्या कार्डवरून कॅशलेस ट्रांजक्शन करत असाल तर तुम्हाला तीन बिल पेमेंट्सवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकते. एसबीआयने ही ऑफर याच महिन्यात सुरु केली असून 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. जाणून घ्या, कशाप्रकारे एसबीआय कार्डवरून पेमेंट करून 5 टक्के कॅशबॅकचा लाभ घेता येऊ शकतो.

एसबीआय कार्डची कॅशबॅक ऑफर
एसबीआयच्या कॅशबॅक ऑफरसाठी तुम्हाला SBI Card Website/Mobile App वर ऑटोपे रजिस्ट्रेशन करावे लागेल. तीन बिल पेमेंट्सवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. एसबीआयच्या नियमानुसार एका बिल पेमेंटवर तुम्हाला 100 रुपयापर्यंत कॅशबॅक मिळेल. अर्थात तीन बिल पेमेंट्सवर तुम्हाला 300 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

या तारखेला कॅशबॅक होईल क्रेडिट
एसबीआयच्या माहितीनुसार, कॅशबॅक मिळवण्यासाठी ऑटोपे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तीन बिलांचे पेमेंट 4 महिन्यांच्या आत करावे लागेल. तरच या कॅशबॅक ऑफरचा फायदा मिळेल. एसबीआय कार्डने पेमेंट केल्यानंतर जो कॅशबॅक तुम्हाला मिळाला आहे, तो 31 मार्च 2021 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होईल.

एसबीआयच्या 'या' कार्डवर मिळेल ऑफर
ही ऑफर कॉरपोरेट कार्ड्स सोडून एसबीआयच्या सर्व क्रेडिट कार्ड्सवर ही ऑफर उपलब्ध आहे. याशिवाय या ऑफरचा फायदा तुम्हाला इस्टंट रिचार्ज किंवा बिल पेमेंट्सवर देखील मिळणार नाही.

अशा पद्धतीने मिळवा ऑफरचा फायदा
एसबीआय कार्डच्या मोबाइल अॅपवर लॉग इन करा. यानंतर E-Store वर क्लिक करा. ज्यानंतर Bill Pay & Recharge हा पर्याय येईल. त्याठिकाणी तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर याठिकाणी डिस्क्लेमर वाचून Proceed वर क्लिक केल्यानंतर Add Biller वर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला  सर्व माहिती भरून ऑटोपे सेटअप पूर्ण करावे लागेल.

याचबरोबर, ही प्रोसेस तुम्ही एसबीआय वेबसाइटवर देखील करू शकता. यासाठी सर्वात आधी एसबीआयच्या वेबसाइटवर लॉग इन करा. त्यानंतर Utility Bill Payment वर क्लिक केल्यानंतर Pay Now चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि डिस्क्लेमर वाचून Proceed वर क्लिक करा. त्यानंतर  Add Biller वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला याठिकाणी सर्व माहिती भरून ऑटोपे सेटअप पूर्ण करावे लागेल.

Web Title: SBI bank card is getting 5 cashback, you can avail till december 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.