lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील उत्पादनाचा कांदा निर्यातीवरही परिणाम

देशातील उत्पादनाचा कांदा निर्यातीवरही परिणाम

भारत हा जगातील दोन नंबरचा कांदा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. निर्यातीमध्येही पहिला किंवा दुसरा क्रमांक असतो. परंतू खराब हवामान व दुष्काळामुळे उत्पादन कमी होवू लागले

By admin | Published: August 30, 2015 02:11 AM2015-08-30T02:11:06+5:302015-08-30T02:11:06+5:30

भारत हा जगातील दोन नंबरचा कांदा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. निर्यातीमध्येही पहिला किंवा दुसरा क्रमांक असतो. परंतू खराब हवामान व दुष्काळामुळे उत्पादन कमी होवू लागले

The result of production of onion exports in the country | देशातील उत्पादनाचा कांदा निर्यातीवरही परिणाम

देशातील उत्पादनाचा कांदा निर्यातीवरही परिणाम

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
भारत हा जगातील दोन नंबरचा कांदा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. निर्यातीमध्येही पहिला किंवा दुसरा क्रमांक असतो. परंतू खराब हवामान व दुष्काळामुळे उत्पादन कमी होवू लागले असून त्याचा फटका निर्यातीवरही बसू लागला आहे. तिन वर्षापासून सातत्याने निर्यातीचा आकडा घसरू लागला असून ही कृशी व्यापारासाठी चिंतेची गोष्ट आहे.
देशात प्रचंड कांदा टंचाई सुरू झाली आहे. कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांदा हाच चर्चेचा मुद्दा बनला आहे. विरोधी पक्षांनी भाववाढीवरून सरकारला धारेवर धरण्यास सुरवात केली आहे. जगातील प्रमुख कांदा उत्पादक देशांमध्ये भारताचा समावेश आहे.चीननंतर सर्वाधीक उत्पादन देशामध्ये होत असते. देशात सर्वाधीक उत्पादन महाराष्ट्रात होत असून त्याचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. शासनाने मागील काही वर्षांपासून कृषी मालाची निर्यात वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील कांद्याचा दर्जा चांगला असल्यामुळे पुर्ण जगामधून भारतीय कांद्याला मागणी आहे. तब्बल ७६ देशांमध्ये भारत कांद्याची निर्यात करत आहे. निर्यात करणाऱ्या देशांमध्ये कधी पहिला तर कधी दुसरा क्रमांक आपलाच असतो.
भारतामधून २०१२ - १३ ला तब्बल १६ लाख ६६ हजार ८७२ मेट्रीक टन कांद्याची निर्यात झाली होती. यामधून तब्बल १९६६ कोटी ६३ लाख रूपयांची उलाढाल झाली होती. २०१४ - १५ मध्ये आवक घसरून ती १२ लाख ३८ हजार १०२ मेट्रीक टन निर्यात झाली असून त्यामधून २३०० कोटी ५४ लाख रूपयांची उलाढाल झाली आहे. उलाढालीचा आकडा वाढला असला तरी तब्बल ४ लाख २८ हजार ७७० मेट्रीक टन निर्यात घसरली आहे. प्रत्येक वर्षी सातत्याने निर्यात घसरु
लागली आहे. शासन निर्यातीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे उत्पादनावर झालेल्या परिणामामुळे कांदा निर्यात घसरत असून ती कृषी व्यापारासाठी चिंतेची गोष्ट आहे. भारतीय कांद्याचा दर्जा चांगला असल्यामुळे जगभरातून त्याला मागणी असते. परंतू मागील तिन वर्षामध्ये सातत्याने दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे कांदा उत्पादनावर परिणाम होत असून त्याचा फटका निर्यातीवरही होत आहे. जगाला कांदा पुरविणाऱ्या भारताला कांदा आयात करण्याची वेळ आली आहे.

देशात सर्वाधीक कांदा उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. एकूण उत्पादनामध्ये राज्याचा वाटा जवळपास तिस टक्के आहे. यामुळे सर्वाधीक निर्यातही महाराष्ट्रातून होत आहे. समुद्र मार्गे मोठ्याप्रमाणात कांद्याची निर्यात आखाती व इतर आशीयायी देशांना होत आहे. निर्यातीसाठी चांगल्या दर्जाच्या कांद्याचा उपयोग केला जातो.

७६ देशांमध्ये निर्यात
भारतामधून जगातील ७६ देशांना कांदा निर्यात केला
जात आहे. सर्वाधीक आशीयायी व आखाती देशांमध्ये होत आहे. देशातील कांद्याचा दर्जा चांगला असल्यामुळे त्याला जगभर मागणी असते. परंतू उत्पादन व बाजारभावात सातत्य नसल्यामुळे निर्यात वाढत नाही.
भारतामधून सर्वाधीक निर्यात होणारे पाच देश
देशनिर्यात(मे.ट.)किंमत (करोड )
बांगलादेश४५६७३४७७९. ६४
मलेशीया२१५१९४४१६. २१
श्रीलंका१३१६४६२५८.३९
युएई१३१६३०२४७. ७२
नेपाल७०५४३१३९. ४०

जगातील निर्यात करणारे प्रमुख देश
नेदरलँड, भारत, मॅक्सीको, चीन, स्पेन, इजीप्त, युएसए, न्यूझीलंड, फ्रांस, पेरू

कांदा निर्यातीचा तपशील
वर्षनिर्यातकिंमत
२०१२ - १३१६६६८७२.६०१९६६.६३
२०१३ - १४१४२४९८.५८३१६९.६१
२०१४- १५१२३८१०२.६०२३००.५४
(निर्यात क्विंटल, किंमत करोडमध्ये )

Web Title: The result of production of onion exports in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.