lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओचा जबरदस्त प्लॅन, ९० दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह राहणार सिम; १८० जीबी डेटा आणि अन्य फायदे

जिओचा जबरदस्त प्लॅन, ९० दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह राहणार सिम; १८० जीबी डेटा आणि अन्य फायदे

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 01:09 PM2022-12-26T13:09:07+5:302022-12-26T13:13:08+5:30

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत असते.

reliance Jio s great plan the SIM will be active for 90 days 180 GB data and other benefits unlimited calling sms | जिओचा जबरदस्त प्लॅन, ९० दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह राहणार सिम; १८० जीबी डेटा आणि अन्य फायदे

जिओचा जबरदस्त प्लॅन, ९० दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह राहणार सिम; १८० जीबी डेटा आणि अन्य फायदे

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत असते. सध्या कंपनी महिन्याच्या प्लॅनसह, तीन महिन्यांचे, वर्षाचे प्लॅनही ऑफर करत आहे. रिलायन्स जिओचा एक प्लॅन ९० दिवसांच्या वैधतेसहदेखील येतो. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह अन्य बेनिफिट्सही दिले जातात. पाहूया काय आहेत ही बेनिफिट्स.

रिलायन्स जिओचा ७४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये ग्राहकांना १८० जीबी डेटा दिला जातो. यामद्ये दररोज २ जीबी डेटा वापरता येतो. दिवसाला २ जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होतो. याशिवाय या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस दिले जातात. तसंच यामध्ये जिओ ॲप्सचंही सबस्क्रिप्शन दिलं जातं.

जर तुम्ही ५ जी सेवा मिळत असलेल्या शहरांमध्ये राहत असाल, तर तुम्हाला ५ जी वेलकम ऑफर अंतर्गत अनलिमिटेड ५ जी डेटा दिला जातो. युझर्सकडे ५जी सपोर्टेड स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. ज्या लोकांना ५जी इन्वाईट मिळालं आहे, त्यांना ही सेवा मोफत वापरता येऊ शकते. जर तुम्हाला थोडा स्वस्त प्लॅन हवा असेल तर तुम्ही दररोज २ जीबी लिमिट असलेला ७१९ रुपयांचा प्लॅनही वापरू शकता. हा प्लॅन ७१९ रूपयांना मिळतो. यामध्ये एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ ॲप्सचंही सबस्क्रिप्शन देण्यात येतं.

Web Title: reliance Jio s great plan the SIM will be active for 90 days 180 GB data and other benefits unlimited calling sms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.