lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात 'संधींची त्सुनामी' : मुकेश अंबानी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात 'संधींची त्सुनामी' : मुकेश अंबानी

Mukesh Ambani : येणाऱ्या दशकात भारताला जगातील पहिल्या तीन देशाच्या अर्थव्यवस्थेत सामील होण्याची संधी; मुकेश अंबानींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 07:38 PM2021-03-26T19:38:18+5:302021-03-26T19:39:02+5:30

Mukesh Ambani : येणाऱ्या दशकात भारताला जगातील पहिल्या तीन देशाच्या अर्थव्यवस्थेत सामील होण्याची संधी; मुकेश अंबानींनी व्यक्त केला विश्वास

Reliance industries Mukesh Ambani sees a tsunami of opportunities for entrepreneurs | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात 'संधींची त्सुनामी' : मुकेश अंबानी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात 'संधींची त्सुनामी' : मुकेश अंबानी

Highlightsयेणाऱ्या दशकात भारताला जगातील पहिल्या तीन देशाच्या अर्थव्यवस्थेत सामील होण्याची संधी, अंबांनींचा विश्वास

खासगी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केल्यानं देशातील उद्योजकांसाठी निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये संधींची त्सुनामी आल्याचं मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि उद्योजक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं. भारत एक आर्थिक, लोकशाही असलेला, रणनितीक आणि सांस्कृतिक शक्तीच्या रूपात वेगानं पुढे जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुकेश अंबानी यांनी ईओआय २०२० या पुरस्कार सोहळ्यात (22nd Entrepreneur of the Year – India (EOY) 2020 Awards ceremony) उपस्थितांना संबोधित केलं. 

"मी जेव्हा आज आणि उद्याचा भारत जेव्हा पाहतो त्यावेळी उद्योजकांसाठी संधींची त्सुनामी आल्याचं दिसून येतं. माझा हा विश्वास दोन कारणांमुळे आला आहे. पहिला म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या भविष्यातील विकासात खासगी क्षेत्रांच्या भूमिकेचं स्वागत करतात. तसंच दुसरं कारण म्हणजे तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून १.३ अब्ज भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात," असं अंबानी म्हणाले.

अनेक संधी उपलब्ध

"गेल्या महिन्यात पंतप्रधानांनी देशाच्या विकासात खासगी क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं समर्थन केलं होतं. खासगी क्षेत्राला वाईट म्हणण्याची संस्कृती ही अयोग्य असल्याचं ते म्हणाले होते. येत्या दशकात जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी होण्याची क्षमता आपल्यात आहे.  ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, जीवशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान सारख्या नव्या क्षेतांमध्ये तसंच शेती, उद्योग आणि सेवा या क्षेत्रात बदल होणाऱ्या बदलांमुळे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.

भारतीय उद्योजक आता प्रतिस्पर्धी किंमतीला बाजाराच्या गरजेनुसार जागतिक स्तरावरील गुणवत्त उपलब्ध करून देण्यात सक्षम आहेत. यामुळेच भारतीय उद्योजकांसाठी संपूर्ण जागतिक बाजारपेठही आता उघडली असल्याचंही अंबानी यांनी नमूद केलं. नवीन उद्योग सुरू करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुण उद्योजकांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं. तसंच त्यांनी अपयशानं घाबरू नये. अनेक चढउतारांनंतरच यश मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्ही माझ्या पिढीच्या तुलनेत भारतासाठी चांगल्या यशोगाथा लिहाल, असंही अंबानी म्हणाले.

Web Title: Reliance industries Mukesh Ambani sees a tsunami of opportunities for entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.