lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani: "जामनगर आता आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आहे", मुकेश अंबानींनी मानले आभार

Mukesh Ambani: "जामनगर आता आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आहे", मुकेश अंबानींनी मानले आभार

Mukesh Ambani Visited Dwaraka: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा नुकताच विवाहपूर्व सोहळा पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 09:02 PM2024-03-05T21:02:36+5:302024-03-05T21:02:43+5:30

Mukesh Ambani Visited Dwaraka: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा नुकताच विवाहपूर्व सोहळा पार पडला.

Reliance Industries Chairman Mukesh Ambani offered prayers at the Dwarkadhish temple in Gujarat and he says Jamnagar is now on the international platform | Mukesh Ambani: "जामनगर आता आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आहे", मुकेश अंबानींनी मानले आभार

Mukesh Ambani: "जामनगर आता आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आहे", मुकेश अंबानींनी मानले आभार

जामनगर: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा नुकताच विवाहपूर्व सोहळा पार पडला. गुजरातमधील जामनगर येथे झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक नामांकित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. अंबानींच्या या कार्यक्रमाची जगभरात चर्चा झाली. अशातच मुकेश अंबानी यांनी जामनगर येथील द्वारकाधीशचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्वांचे आभार मानले.

मुकेश अंबानी जामनगरमध्ये त्यांचा मुलगा अनंतच्या विवाहपूर्व सोहळ्यासाठी उपस्थित होते. मात्र, द्वारकाधीशचे दर्शन घेताना ते एकटेच दिसले. त्यांच्यासोबत कुटुंबातील एकही सदस्य दिसला नाही. 

भगवान द्वारकाधीशचा आशीर्वाद घेतल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, भगवान द्वारकाधीशच्या आशीर्वादाने अनंत आणि राधिकाचा विवाहपूर्व सोहळा पार पडला. मी जामनगरच्या लोकांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. जामनगर आता आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म झाले आहे. नीता अंबानी आणि मी लोकांचे खूप आभारी आहोत आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी त्यांची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. १ ते ३ मार्च दरम्यान या जोडप्याचा विवाहपूर्व सोहळा पार पडला. अनंत आणि राधिका यांचा हा खास सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात जवळपास संपूर्ण बॉलिवूड सहभागी झाले होते. इतकेच नाही तर अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमाला हॉलिवूडमधील अनेक स्टार्सही जामनगरला पोहोचले होते.

राधिका मर्चंट ही अनंत अंबानी यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे. राधिकाचा जन्म हा १८ डिसेंबर १९९४ मध्ये झाला. ती उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. यापूर्वी राधिका अंबानी कुटुंबाच्या अनेक फंक्शन्समध्ये झळकली आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यानंतर आता जामनगरमध्ये प्री-वेडिंग आणि लग्न मुंबईत होणार आहे. 

Web Title: Reliance Industries Chairman Mukesh Ambani offered prayers at the Dwarkadhish temple in Gujarat and he says Jamnagar is now on the international platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.