lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली

गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली

गोल्ड लोन हे एक सोप्या पद्धतीने मिळणारे कर्ज आहे. यामुळे या कर्जात परतफेड केली जात नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 02:10 PM2024-03-13T14:10:13+5:302024-03-13T14:12:06+5:30

गोल्ड लोन हे एक सोप्या पद्धतीने मिळणारे कर्ज आहे. यामुळे या कर्जात परतफेड केली जात नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली आहे.

rbi asks banks to provide detail on gold loan frauds | गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली

गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली

 गेल्या काही दिवसापासून आरबीआयने काही बँकांवर मोठी कारवाई केली आहे. पेटीएम आणि आयआयएफएलवरील कारवाईनंतर आरबीआयने गोल्ड लोनवरही कारवाई केली.  यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना गोल्ड लोन फसवणूक प्रकरणात आवश्यक माहिती देण्यास सांगितले आहे. गोल्ड लोन हे सहज उपलब्ध होणारे कर्ज आहे, या कर्जावर अनेकजण परतफेड करत नाहीत. यामुळे बँकेचे नुकसान होते. आता या गोल्ड लोन फसवणूक प्रकरणाबाबत, आरबीआयने बँकांना नोंदवलेली फसवणूक, पोर्टफोलिओमधील डिफॉल्ट आणि पैसे वसूल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यास सांगितले आहे.

बँकांचे कर्मचारी गोल्ड लोन बाबतीत यंत्रणेत छेडछाड करत असल्याचा संशय आहे. यासारखे अनेक प्रकरण समोर आली आहे.  यात बँक कर्मचाऱ्यांनी गोल्ड लोनचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी यंत्रणेशी छेडछाड केली. दोन्ही प्रकरणे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने बँकांकडून डेटा मागवला आहे.

₹१३०० वरुन आपटून शेअर आला ₹४२ वर, आता गुंतवणूकदारांच्या उड्या; लागलं अपर सर्किट 

गोल्ड लोनशी संबंधित माहिती विचारण्याव्यतिरिक्त, रिझर्व्ह बँकेने बँकांना इतर सूचना देखील दिल्या आहेत. बँकांना त्यांच्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे, जेणेकरून बँकांची कर्ज देण्याची प्रक्रिया रिझव्र्ह बँकेने ठरवून दिलेल्या पॅरामीटर्सनुसार आहे की नाही हे कळू शकेल.

रिझर्व्ह बँक स्वतःहून गोल्ड लोन डेटा देखील ऍक्सेस करू शकते. ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा डेटा मोठ्या कर्जावरील माहितीच्या केंद्रीय भांडारातून उपलब्ध होईल, तर लहान कर्जाची माहिती CIBIL सारख्या क्रेडिट माहिती ब्युरोद्वारे प्रदान केली जाऊ शकते. त्यानंतरही, रिझर्व्ह बँकेने बँकांना डेटा प्रदान करण्यास सांगितले आहे, कारण त्यांना मोठ्या कर्जांमधील फसवणुकीचे स्वरूप जाणून घ्यायचे आहे जे सेंट्रल रिपॉझिटरी किंवा CIBIL मध्ये कॅप्चर केलेले नाहीत.

काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेला काही बँकांमधील सोन्याच्या कर्जाच्या फसवणुकीच्या प्रकरणाबाबत व्हिसलब्लोअर्सकडून माहिती मिळाली होती. कर्मचाऱ्यांनी काही अनुकूल ग्राहकांशी संगनमत करून त्यांना तारण न घेता सोने कर्ज दिले. म्हणजेच सोने गहाण न ठेवता लोकांना गोल्ड लोन देण्यात आले. काही वेळाने ग्राहकांकडून संपूर्ण पैसे भरण्यात आले. या प्रकरणांमध्ये, कर्मचाऱ्यांनी कर्ज प्रक्रिया शुल्क बँकेच्या खर्चाच्या खात्यातूनच भरले, तर व्याजाच्या भरणामध्ये व्यवस्थेत हेराफेरी करून गोंधळ घातला. या पद्धतीने बँक कर्मचाऱ्यांनी गोल्ड लोनचे टारगेट पूर्ण केल्याचे समोर आले आहे. 

Web Title: rbi asks banks to provide detail on gold loan frauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.