lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पंप आणि व्हॉल्व्ह्ज उत्पादक 'केएसबी लिमिटेड'ची तिसऱ्या तिमाहीत ३१ टक्के वाढीची नोंद

पंप आणि व्हॉल्व्ह्ज उत्पादक 'केएसबी लिमिटेड'ची तिसऱ्या तिमाहीत ३१ टक्के वाढीची नोंद

भारतीय कंपनीने गेल्या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत ३१ टक्के वाढ नोंदवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 03:36 PM2023-11-16T15:36:36+5:302023-11-16T15:37:44+5:30

भारतीय कंपनीने गेल्या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत ३१ टक्के वाढ नोंदवली आहे.

Pumps and valves manufacturer KSB Ltd reported 31 percent growth in the third quarter | पंप आणि व्हॉल्व्ह्ज उत्पादक 'केएसबी लिमिटेड'ची तिसऱ्या तिमाहीत ३१ टक्के वाढीची नोंद

पंप आणि व्हॉल्व्ह्ज उत्पादक 'केएसबी लिमिटेड'ची तिसऱ्या तिमाहीत ३१ टक्के वाढीची नोंद

केएसबी लिमिटेड या आघाडीच्या पंम्प्स आणि व्हॉल्व्ह्ज उत्पादक असलेल्या भारतीय कंपनीने गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३१ टक्के वाढ नोंदवली आहे.

  • विक्रीचे मूल्य ५,६३७ दशलक्ष रुपये झाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ३१ टक्क्यांच्या वाढीची नोंद.
  • २०२३ च्या ‍तिसऱ्या तिमाहीतील विक्रीचे मूल्य हे १६,४४६ दशलक्ष रुपये झाले म्हणजेच गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ २७ टक्के आहे.  
  • सीबीई व्हॉल्व्ह्ज विभागाने वायटीडी २०२३ या काळात सर्वाधिक ऑर्डर्स मिळवल्या- ३१७३ दशलक्ष रुपये.
  • न्युक्लियर बिझनेसने ५५ दशलक्ष रुपयांच्या ऑक्झिलरी पंपांची ऑर्डर न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून प्राप्त झाली.
  • पीएम कुसुम योजने अंतर्गत यूपी आणि हरियाणा सरकारकडून अनुक्रमे २७८ दशलक्ष रुपये आणि १२ दशलक्ष रुपयांची एलओए (ऑर्डर ॲक्सेप्टन्स) प्राप्त झाली.
  • एक्सपोर्ट बिझनेस - टेक्निमाँट एसपीए इटलीमधून २०५ दशलक्ष रुपयांची एक्सपोर्ट ऑर्डर तर ग्रीकच्या कायनॅटिक्स टेक्नॉलॉजी एसपीए कडून त्यांच्या एलपीजी एक्स्ट्रॅक्शन ॲन्ड ऑईल रिफायनरी प्रोजेक्टसाठी १४९ दशलक्ष रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली.

संरक्षण विभागाकडून यशस्वी ऑर्डर्स - बीबीएम ॲकॉस्टिक इंडिया प्रा. लिमिटेड कडून २८.५ दशलक्ष रुपये (शिप), आणि एमओडी, भारतीय नौदलाकडून इंडिजिनायझेशन युनिटसाठी (सबमरीन)  ६. १ दशलक्ष रुपयांची ऑर्डर.

‍                                                                                       बिझनेस हायलाईट्स

                                                                       (सर्व रकक्म भारतीय दशलक्ष रुपयांमध्ये)

तपशीलतिसरी तिमाही -२०२३ (जुलै
२३- सप्टेंबर २३)
तिसरी तिमाही-२०२२ (जुलै
२२- सप्टेंबर२२)
जाने २३-
सप्टेंबर
२३
जाने२२-
सप्टेंबर
२२
विक्री५,६३७४,३१३१६,४४६१२,९७४
खर्च४,९३४३,७७२१४,३१९११,२७५
कार्यातून होणारा नफा७०३५४१२,१२७१,६९९
ओपीएम %१२%१३%१३%३६७
अन्य उत्पन्न८४१०६२९८३६७
व्याज२०१३३७३६
घसारा१२३११७३६०३३३
पीबीटी६४४५१७२,०२८१,६७९
निव्वळ नफा४८१३७८१,५१८१,२५१

“२०२३ च्या तिसर्‍या तिमाहीत केएसबी लिमिटेड ने वार्षिक विक्रीत ३१ टक्के वाढ नोंदवली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत तसेच मागील तीन तिमाहीतील सर्वाधिक विक्रीत २७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या काळातील आमची कामगिरी ही उत्कृष्ट राहिली आणि या कालावधीत आम्ही अनेक चांगल्या गोष्टी करु शकलो.  २०२३ च्या तिसर्‍या तिमाहीत सक्षम अशा ऑर्डर्स मिळाल्यामुळे आम्ही हीच प्रगतीशील कामगिरी सुरु ठेवत आहोत. आमच्या निर्यात व्यवसायामध्ये अशीच सातत्यपूर्ण वाढ होईल या विषयी आम्ही खूपच सकारात्मक आहोत आणि त्यामुळे जागतिक स्तरावर आमची आघाडी आणखी सक्षम होईल. त्याच बरोबर आमच्या सोलार विभागाने मोठी वाढ नोंदवली, ज्यामुळे शाश्वत उपायांसह भविष्यातील लक्ष अधिक सक्षम होऊ शकेल. आम्ही यशस्वीपणे ई सेल्स टूल्स आमच्या सर्व केंद्रांमध्ये सुरु केल्यामुळे आमची कार्यक्षमता आणि नफा यामध्ये नक्कीच वाढ होईल. पुढे जात असतांना आम्ही कुशलता, शाश्वतता आणि आमच्या सर्व महत्त्वपूर्ण घटकांसाठी मूल्य निर्माण करण्यास वचनबद्ध आहोत,” असे २०२३ च्या तिसर्‍या तिमाही विषयी थोडक्यात चर्चा करतांना केएसबी लिमिटेड सेल्स आणि मार्केटिंगचे व्हाईस प्रेसिडेंट फारुख भथेना यांनी सांगितले.

Web Title: Pumps and valves manufacturer KSB Ltd reported 31 percent growth in the third quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.