lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!, 1 डिसेंबरपासून बँक बदलणार ATM संबंधित नियम

PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!, 1 डिसेंबरपासून बँक बदलणार ATM संबंधित नियम

PNB : बँक वन टाइम पासवर्ड आधारित रोख पैसे काढण्याची यंत्रणा आणणार आहे. ही नवीन यंत्रणा 1 डिसेंबर 2020 पासून सुरू होईल.

By ravalnath.patil | Published: November 28, 2020 03:33 PM2020-11-28T15:33:47+5:302020-11-28T16:18:25+5:30

PNB : बँक वन टाइम पासवर्ड आधारित रोख पैसे काढण्याची यंत्रणा आणणार आहे. ही नवीन यंत्रणा 1 डिसेंबर 2020 पासून सुरू होईल.

pnb introduce new way of atm cash withdrawal from 1st december 2020 otp based cash withdraw facility | PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!, 1 डिसेंबरपासून बँक बदलणार ATM संबंधित नियम

PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!, 1 डिसेंबरपासून बँक बदलणार ATM संबंधित नियम

Highlights1 डिसेंबरपासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजताच्या दरम्यान PNB 2.0 ATM मधून एका वेळी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढणे आता ओटीपी आधारित असेल.

नवी दिल्ली : देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) 1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात येणार आहे. चांगल्या बँक सुविधा (Bank Facility) आणि फ्रॉड एटीएम व्यवहारापासून (Fraud ATM Transaction) ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी पीएनबीने हे पाऊल उचलले आहे.

बँक वन टाइम पासवर्ड आधारित रोख पैसे काढण्याची यंत्रणा आणणार आहे. ही नवीन यंत्रणा 1 डिसेंबर 2020 पासून सुरू होईल. त्याअंतर्गत तुम्हाला एटीएममधून रोकड काढण्यासाठी बँकेकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारांना लागू असेल. ट्विटद्वारे बँकेने याबाबत माहिती दिली आहे.

पीएनबीच्या ट्विटनुसार, 1 डिसेंबरपासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजताच्या दरम्यान PNB 2.0 ATM मधून एका वेळी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढणे आता ओटीपी आधारित असेल. म्हणजेच पीएनबी ग्राहकांना रात्रीच्यावेळी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल. यासाठी ग्राहकांना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल सोबत घेऊन जावा लागणार आहे.

काय आहे, PNB 2.0 ?
युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे, जे 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आले. यानंतर याला PNB 2.0 असे नाव देण्यात आले आहे. बँकेच्या ट्विट व मेसेजमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, ओटीपी आधारित रोख रक्कम फक्त PNB 2.0 ATM मध्ये लागू असेल. म्हणजेच इतर बँक एटीएममधून पीएनबी डेबिट / एटीएम कार्डमधून पैसे काढण्यासाठी ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा लागू होणार नाही.

कशी काम करणार यंत्रणा?
- पीएनबी एटीएमवर पैसे काढण्यासाठी बँक आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवेल.
- हे ओटीपी केवळ एका व्यवहारावर कार्य करेल.
- या नवीन यंत्रणेमुळे रोख काढण्याच्या सध्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.
- नवीन यंत्रणा बनावट कार्डांवरील अवैध व्यवहार रोखू शकेल, असे बँकेचे म्हणणे आहे.
 

Web Title: pnb introduce new way of atm cash withdrawal from 1st december 2020 otp based cash withdraw facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.