PM Kisan 21st Installment Latest Update: केंद्र सरकारने आतापर्यंत 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना २० हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. आता सर्व लाभार्थी २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या शेतकऱ्यांपैकी एक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या वर्षी काही शेतकऱ्यांचे २० व्या हप्त्याचे पैसे एका छोट्या चुकीमुळे अडकले होते. जर तुम्हीही तीच चूक केली असेल, तर तुमचा २१ वा हप्ताही अडकू शकतो. त्यामुळे हा हप्ता येण्यापूर्वीच तुमची सर्व माहिती तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
२१ व्या हप्त्यापूर्वी 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा
योजनेसाठी अर्ज करताना किंवा नंतर काही महत्त्वाची माहिती चुकीची भरली गेली असेल, तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. खालील चुका लगेच तपासा.
- तुमचे नाव आधार कार्डवरील नावाशी जुळत नाहीये.
- बँक खाते क्रमांक चुकीचा भरला गेला आहे.
- ई-केवायसी (e-KYC) अपडेट केलेले नाही.
अशा प्रकरणांमध्ये सरकारकडून पैसे दिले जात नाहीत आणि शेतकऱ्याला पुढील हप्त्यापर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे, आर्थिक मदत कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावी यासाठी तुमची सर्व माहिती वेळेवर आणि योग्यरित्या अपडेट केलेली आहे, याची खात्री करा.
तुमचा स्टेटस कसा तपासाल?
तुमच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
- सर्वात आधी PM-KISAN च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होमपेजवरील 'Farmer Corner' सेक्शनमध्ये जाऊन 'Beneficiary Status' या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुमची स्थिती तपासा.
तुमच्या स्टेटसमध्ये e-KYC, भूमी रेकॉर्ड संलग्नता (Land Seeding) आणि आधार-बँक संलग्नता या तिघांसमोर 'Yes' असे लिहिलेले असेल, तर तुम्हाला हप्ता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जर यापैकी कोणत्याही ठिकाणी 'No' दिसत असेल, तर तुम्हाला संबंधित माहिती त्वरित अपडेट करावी लागेल. पैसे जमा झाल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक एसएमएस अलर्टही येतो.
वाचा - ४० लाखांच्या गृहकर्जावर वाचवू शकता तब्बल २८ लाख रुपये! 'या' फॉर्म्युल्याने लवकर कर्ज फेडा
या योजनेची घोषणा १ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात झाली होती आणि २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून याची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते.