lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन वर्षांचे वीजबिल एकदा भरा, 25 वर्षे मिळवा मोफत वीज; पंतप्रधान सूर्यघर योजना

दोन वर्षांचे वीजबिल एकदा भरा, 25 वर्षे मिळवा मोफत वीज; पंतप्रधान सूर्यघर योजना

१ कोटी घरांवर बसविणार सोलर पॅनल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 05:55 AM2024-02-18T05:55:50+5:302024-02-18T05:56:38+5:30

१ कोटी घरांवर बसविणार सोलर पॅनल

Pay electricity bill once for two years, get free electricity for 25 years; Pradhan Mantri Suryaghar Yojana | दोन वर्षांचे वीजबिल एकदा भरा, 25 वर्षे मिळवा मोफत वीज; पंतप्रधान सूर्यघर योजना

दोन वर्षांचे वीजबिल एकदा भरा, 25 वर्षे मिळवा मोफत वीज; पंतप्रधान सूर्यघर योजना

ऋषिराज तायडे

मुंबई : समजा, तुमची दरमहा विजेची गरज सरासरी १०० ते १३० युनिट आहे आणि त्यासाठी तुम्हाला सरासरी १००० ते १२०० रुपयांपर्यंत वीजबिल येत असेल, तर तुमच्या वीजबिलाची दोन वर्षांची रक्कम एकदाच भरून तुम्ही पुढील किमान २५ वर्षे मोफत वीज मिळवू शकता. होय हे शक्य आहे, पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून. केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून १ कोटी घरांवर सोलर रुफटॉप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सध्या तुम्हाला येणारे विजेचे बिल (१३० युनिटसाठी)

दरमहा वीजबिल - ११०० ते १२०० रुपये

वर्षभराचे वीजबिल - १३,२०० ते १४,४०० रुपये

दोन वर्षांचे वीजबिल - २६,४०० ते २८,८०० रुपये

कसे वाचणार तुमचे वीजबिल?

४.३२युनिट

दररोजची वीजनिर्मिती

१३०.६ युनिट

महिन्याची वीजनिर्मिती

४७,०००

प्रकल्पाचा एकूण खर्च

२९,०००

ग्राहकाचा खर्च

१ किलोवॅटसाठी आवश्यक छत

१३० चौ.फूट (१२ चौ.मी.)

पीएम सूर्यघर योजनेबाबत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी ‘पीएम सूर्यघर : मुफ्त बिजली योजने’ची नुकतीच घोषणा केली.  त्यासाठी केंद्राने ७५ हजार कोटींची तरतूदही केली आहे.

योजनेसाठी किमान १३० ते १००० चौ. फूट क्षेत्रफळाचे छत आवश्यक आहे. फ्लॅट वा भाडेकरूंना योजनेचा लाभ घेता येत नाही.

https://pmsuryaghar. gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून छताच्या क्षेत्रफळानुसार आणि तुमच्या गरजेनुसार तितक्या क्षमतेचे सोलर पॅनल बसविता येते. त्यासाठी सरकारकडून अनुदानही मिळते.

Web Title: Pay electricity bill once for two years, get free electricity for 25 years; Pradhan Mantri Suryaghar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.