Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान-2 पणजीत 90 हजारांचा भेसळजन्य मावा जप्त - चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची कारवाई तीव्र

पान-2 पणजीत 90 हजारांचा भेसळजन्य मावा जप्त - चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची कारवाई तीव्र

पणजीत 90 हजारांचा भेसळजन्य मावा जप्त

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:28+5:302014-08-25T21:40:28+5:30

पणजीत 90 हजारांचा भेसळजन्य मावा जप्त

PANAJI: 90,000 fake cases of fake encounter: FDA takes action against quartet | पान-2 पणजीत 90 हजारांचा भेसळजन्य मावा जप्त - चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची कारवाई तीव्र

पान-2 पणजीत 90 हजारांचा भेसळजन्य मावा जप्त - चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची कारवाई तीव्र

जीत 90 हजारांचा भेसळजन्य मावा जप्त
चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची कारवाई तीव्र
पणजी : अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांनी येथील बसस्थानकावर भेसळीच्या संशयावरून सुमारे 600 किलो मावा जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे 90 हजार रुपये आहे. गणेश चतुर्थीनिमित्त एफडीएने भेसळजन्य मिठाईवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. मिठाई बनविण्यासाठीच हा भेसळजन्य मावा आणला असावा, असा संशय आहे.
वरिष्ठ अन्न निरीक्षक राजीव कोरडे, फ्लाविया डिसोझा यांनी सोमवारी पहाटे ही कारवाई केली. माव्याच्या 20 पिशव्या बेवारस स्थितीत आढळल्या होत्या. ‘राधे स्पेशल बर्फी’ असे लेबल असलेला हा मावा मुंबई किंवा पुण्याहून आलेल्या आंतरराज्य बसगाडीतून आणला गेला असावा, असा संशय आहे. 10 पिशव्यांवर लेबल होते, तर अन्य दहा पॉलिथिन पिशव्यांमध्ये तो भरण्यात आला होता. अज्ञाताने हा मावा येथील कदंब स्थानकावर उतरवून दक्षिण गोव्याकडे प्रयाण केले. मेसर्स तक्षीन डेअरी, गांधीनगर, गुजरात असे लेबल त्यावर आढळून आले आहे. हा भेसळजन्य मावा कोणासाठी आला होता हे अधिकार्‍यांना कळू शकले नाही. प्रत्येक पिशवीत सुमारे 30 किलो मावा होता. लेबलवर त्याच्या उत्पादनाची किंवा किती तारखेपर्यंत वापरण्यास योग्य आहे याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. बेवारस स्थितीत सापडलेला हा मावा अधिकार्‍यांनी जप्त करून त्याची विल्हेवाट लावली. (प्रतिनिधी)

Web Title: PANAJI: 90,000 fake cases of fake encounter: FDA takes action against quartet