Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान १- गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी संथ गतीने

पान १- गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी संथ गतीने

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली :

By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:29+5:302014-08-27T21:30:29+5:30

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली :

Page 1 - Gopinath Munde's death inquiry slow | पान १- गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी संथ गतीने

पान १- गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी संथ गतीने

ीन सिन्हा/ नवी दिल्ली :
केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा ३ जूनला रस्ता अपघात झालेल्या मृत्यूचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) तपास कासव गतीने सुरू आहे. सीबीआयने चौकशी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेली नसल्याचे म्हटले आहे.
या घटनेमागे घातपात असल्याचा आरोप करून भाजपा नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर या अपघाताची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली होती. सीबीआय चौकशीची मागणी सर्वांतआधी भाजपा नेते आणि विधान परिषद सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी केली होती. त्यानंतर वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतली होती. त्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी गृह मंत्रालयाने सीबीआयला चौकशीचे निर्देश दिले होते.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि आरपीआय (ए) नेते रामदास आठवले यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपा कार्यकर्ते आणि इतरांच्या भावनांचा आदर केला जावा आणि या घटनेतील गूढ उकलण्यात आले पाहिजे, असे ते म्हणाले होते.
मुंडे दिल्लीहून महाराष्ट्रात येण्यासाठी विमानतळावर जात असताना सकाळी अपघात झाला होता. त्यांच्या कारला एका कारने जोरदार धडक दिली होती. त्या कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंडे यांचा मृत्यू अंतर्गंत दुखापतींमुळे झाल्याचे उत्तरीय तपासणीच्या अहवालात म्हटले होते. या प्रकरणाचा प्रारंभी तपास करीत असलेल्या दिल्ली गुन्हे शाखेकडून सीबीआयने कागदपत्रे घेतली.
सीबीआयने दिवंगत मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे-पालवे यांचे बयान नोंदविले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या घातपाताचा संशय नाही. यापूर्वी त्यांनी या दु:खद घटनेचे राजकीय भांडवल न करण्याचे आवाहन केले होते.
सीबीआयने मुंडे यांच्या कार चालकांचा देखील जाबजबाब नोंदवला आहे. सरकारला अहवाल सादर करण्यापूर्वी सीबीआयला सर्व पैलूंची चौकशी पूर्ण करायची आहे.

Web Title: Page 1 - Gopinath Munde's death inquiry slow