lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १०० श्रीमंतांकडेच ८० हजार कोटींची संपत्ती, अदानी, अंबानींकडे ३० टक्के संपत्ती

१०० श्रीमंतांकडेच ८० हजार कोटींची संपत्ती, अदानी, अंबानींकडे ३० टक्के संपत्ती

१०० अब्जाधीश भारतीयांच्या संपत्तीत २५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 12:48 PM2022-10-21T12:48:42+5:302022-10-21T12:49:16+5:30

१०० अब्जाधीश भारतीयांच्या संपत्तीत २५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.  

Only 100 rich have 80 thousand crores wealth Adani Ambanis have 30 percent wealth | १०० श्रीमंतांकडेच ८० हजार कोटींची संपत्ती, अदानी, अंबानींकडे ३० टक्के संपत्ती

१०० श्रीमंतांकडेच ८० हजार कोटींची संपत्ती, अदानी, अंबानींकडे ३० टक्के संपत्ती

नवी दिल्ली : भारतातील १०० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची संपत्ती सुमारे ८० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असून अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे यात प्रथम स्थानावर आहेत. फोर्ब्सने जारी केलेल्या २०२२ च्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीनुसार, १०० अब्जाधीश भारतीयांच्या संपत्तीत २५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.  

यादीनुसार, अदानी यांची संपत्ती दुपटीने वाढून १५० अब्ज डॉलर्स झाली आहे. २००८ नंतर श्रीमंतांच्या यादीतील सर्वोच्च स्थानात  बदल आहे.  डीमार्टचे प्रमुख राधाकिशन दमानी हे २७.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.  सायरस पूनावाला हे २१.५ अब्ज डॉलर्स एवढ्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. 

अदानी, अंबानींकडे ३० टक्के संपत्ती
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ८८ अब्ज डॉलर्स एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात पाच टक्के घट झाली आहे. यादीतील व्यक्तींच्या एकूण संपत्तीपैकी ३० टक्के संपत्ती अदानी आणि अंबानी यांच्याकडे आहे. 

Web Title: Only 100 rich have 80 thousand crores wealth Adani Ambanis have 30 percent wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.