lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता येणार ९० रुपयांचे नाणे, तेही चांदीचे! किंमत ५,५०० रुपये

आता येणार ९० रुपयांचे नाणे, तेही चांदीचे! किंमत ५,५०० रुपये

४० ग्रॅम वजन आणि ४४ मिमी व्यास असलेले हे नाणे शुद्ध चांदीचे (९९.९%) आहे. या नाण्याच्या किनाऱ्यावर २०० दातऱ्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 01:34 PM2024-03-22T13:34:51+5:302024-03-22T13:35:30+5:30

४० ग्रॅम वजन आणि ४४ मिमी व्यास असलेले हे नाणे शुद्ध चांदीचे (९९.९%) आहे. या नाण्याच्या किनाऱ्यावर २०० दातऱ्या आहेत.

Now coming 90 rupees coin, very silver! Price Rs 5,500 | आता येणार ९० रुपयांचे नाणे, तेही चांदीचे! किंमत ५,५०० रुपये

आता येणार ९० रुपयांचे नाणे, तेही चांदीचे! किंमत ५,५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला १ एप्रिल रोजी ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकार ९० रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार आहे. नाण्यांचा संग्रह व अभ्यास करणारे सुधीर लुणावत यांच्यामते देशात पहिल्यांदाच ९० रुपयांचे नाणे जारी होत आहे. या नाण्याची किंमत अंदाजे ५,२०० ते ५,५०० रुपयांच्या आसपास असणार आहे. ४० ग्रॅम वजन आणि ४४ मिमी व्यास असलेले हे नाणे शुद्ध चांदीचे (९९.९%) आहे. या नाण्याच्या किनाऱ्यावर २०० दातऱ्या आहेत.

पहिली बाजू

  • नाण्याच्या मुख्य भागावर मधोमध अशोक स्तंभ असून त्याखाली ‘सत्यमेव जयते’ अशी अक्षरे आहेत. 
  • डावीकडे देवनागरी लिपीत भारत आणि उजव्या बाजूला इंग्रजी लिपीत ‘इंडिया’ असे अंकित आहे. 
  • अशोक स्तंभाच्या खाली रुपयाच्या प्रतीक चिन्हासह ९० असा आकडा अंकित करण्यात आलेला आहे.


दुसरी बाजू

  • मध्यभागी रिझर्व्ह बँकेचा लोगो अंकित केला आहे. या लोगोच्या खाली ‘आरबीआय@९०’ असे इंग्रजीत लिहिलेले असून ते रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनाचे प्रतीक आहे. 
  • हे नाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिसऱ्या स्मृती नाण्याचे प्रतीक आहे, जे १९८५ साली रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त जारी करण्यात आले होते. 
  • २०१० साली रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम जयंतीनिमित्तही नाणे जारी केले होते.

Web Title: Now coming 90 rupees coin, very silver! Price Rs 5,500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.