lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘पॅनिक होण्याची गरज नाही, आम्हाला रेकॉर्ड नफा;’ अदानी प्रकरणी SBI चं स्पष्टीकरण

‘पॅनिक होण्याची गरज नाही, आम्हाला रेकॉर्ड नफा;’ अदानी प्रकरणी SBI चं स्पष्टीकरण

नुकतेच एसबीआयचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. तिमाही निकालांनंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 04:02 PM2023-02-04T16:02:12+5:302023-02-04T16:02:34+5:30

नुकतेच एसबीआयचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. तिमाही निकालांनंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

No need to panic we have record profits SBI s explanation in the Adani case adani enterprises Hindenburg research | ‘पॅनिक होण्याची गरज नाही, आम्हाला रेकॉर्ड नफा;’ अदानी प्रकरणी SBI चं स्पष्टीकरण

‘पॅनिक होण्याची गरज नाही, आम्हाला रेकॉर्ड नफा;’ अदानी प्रकरणी SBI चं स्पष्टीकरण

 नुकतेच एसबीआयचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. तिमाही निकालांनंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. एसबीआयचा शेअर 3.12 टक्क्यांनी म्हणजेच 16.45 रुपयांच्या वाढीसह 544.45 रुपयांवर बंद झाला. आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी बँकेचा शेअर 535 रुपयांवर उघडला आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान बँकेचा शेअर 546 रुपयांवर पोहोचला. एका दिवसापूर्वी बँकेचा शेअर 528 रुपयांवर बंद झाला होता. अदानी प्रकरणावर एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, अदानी समूहाला दिलेल्या कर्जावर कोणतीही अडचण नाही. सर्व बाबी नियंत्रणात असून त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही. त्यांना मालमत्तेवर कर्ज देण्यात आले आहे.

भारतातील सर्वात मोठी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केले. SBI ने तिमाही निकालात विक्रमी नफा कमावला आहे. एसबीआयच्या निव्वळ नफ्यात 68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, SBI ला तिसऱ्या तिमाहीत 14,205 कोटी रुपयांचा नफा झालाय. आजपर्यंत एसबीआयमध्ये एवढा नफा कधीच झालेला नाही. तज्ज्ञांना 13,101 कोटी रुपयांचा नफा अपेक्षित होता.

काय आहे आकडेवारी?
कर्जदात्याचे निव्वळ व्याज उत्पन्न, जे कमावलेले आणि खर्च केलेले व्याज यांच्यातील फरक आहे, वार्षिक 30,687 कोटी रुपयांवरून 24 टक्क्यांनी वाढून 38,068 कोटी रुपये झाले आहे. तिसर्‍या तिमाहीत देशांतर्गत निव्वळ व्याज मार्जिन 29 bps ने वाढून 3.69 टक्क्यांवर पोहोचले. मुंबईस्थित कर्जदात्याने गुणवत्तेच्या मालमत्तेखालील एकूण बुडीत कर्जाच्या बाबतीत सुधारणा केली आहे. ग्रॉस लोन रेशो एका तिमाहीपूर्वी 3.52 टक्क्यांवरून 3.14 टक्क्यांवर घसरले आहे. बँकेचा निव्वळ एनपीए तिमाही-दर-तिमाही 0.80 टक्क्यांच्या तुलनेत 0.77 टक्के राहिला.

Web Title: No need to panic we have record profits SBI s explanation in the Adani case adani enterprises Hindenburg research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.