lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या नोटांची छपाई घटवली, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

नव्या नोटांची छपाई घटवली, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

चालू वित्त वर्षात रिझर्व्ह बँकेने नव्या नोटांच्या छपाईच्या आॅर्डरमध्ये घट केली आहे. रिझर्व्ह बँक तसेच व्यावसायिक बँकांच्या तिजो-या जुन्या नोटांनी भरलेल्या असल्यामुळे नव्या नोटा ठेवायला जागाच उरलेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:35 AM2017-11-10T03:35:04+5:302017-11-10T03:35:18+5:30

चालू वित्त वर्षात रिझर्व्ह बँकेने नव्या नोटांच्या छपाईच्या आॅर्डरमध्ये घट केली आहे. रिझर्व्ह बँक तसेच व्यावसायिक बँकांच्या तिजो-या जुन्या नोटांनी भरलेल्या असल्यामुळे नव्या नोटा ठेवायला जागाच उरलेली नाही

New banknotes have been cut, the Reserve Bank decision | नव्या नोटांची छपाई घटवली, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

नव्या नोटांची छपाई घटवली, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई : चालू वित्त वर्षात रिझर्व्ह बँकेने नव्या नोटांच्या छपाईच्या आॅर्डरमध्ये घट केली आहे. रिझर्व्ह बँक तसेच व्यावसायिक बँकांच्या तिजो-या जुन्या नोटांनी भरलेल्या असल्यामुळे नव्या नोटा ठेवायला जागाच उरलेली नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या निर्णयामुळे नव्या नोटांची छपाई पाच वर्षांच्या नीचांकावर गेली आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, वित्त वर्ष-२०१८साठी २१ अब्ज नोटांच्या छपाईची आॅर्डर रिझर्व्ह बँकेने दिली आहे. आदल्या वर्षी ही आॅर्डर २८ अब्ज नोटांची होती. गेल्या पाच वर्षांतील सरासरी छपाई आॅर्डर २५ अब्ज नोटांची होती.
जाणकारांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेकडून नोटांची नवी मालिका आणण्यात येत असल्याचे संकेत या निर्णयातून मिळतात. रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी लिहिलेल्या एका लेखात म्हटले होते की, जानेवारी-२०१६मध्ये रिझर्व्ह बँकेने नोटांच्या नव्या मालिकेवर काम करण्यास सुरुवात केली होती.
नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेत नव्या नोटा वितरित करण्याची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेने पूर्ण केली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या डाटानुसार, १३ आॅक्टोबर रोजी अर्थव्यवस्थेत १५.३ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या. आधीच्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा फक्त १० टक्क्यांनी कमी आहे. एका खाजगी बँकेच्या अधिकाºयाने सांगितले की, व्यावसायिक बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या तिजोºयांत फारच कमी जागा आहे. बंद करण्यात आलेल्या ज्या नोटा बँकांत जमा झाल्या होत्या, त्यातील फक्त ५० ते ६० टक्के नोटाच आतापर्यंत रिझर्व्ह बँकेच्या तिजोºयांत स्थलांतरित करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तथापि, उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, बंद करण्यात आलेल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या ज्या नोटा बँकांत जमा झाल्या होत्या, त्यांची विल्हेवाट अजूनही लावली गेलेली नाही. खरे म्हणजे अजूनही या नोटांची मोजणीच सुरू आहे. त्यामुळे नव्या नोटा ठेवायला ना व्यावसायिक बँकांकडे जागा आहे, ना रिझर्व्ह बँकेकडे.
प्राप्त माहितीनुसार, बंद नोटांच्या पडताळणीसाठी रिझर्व्ह बँक अत्याधुनिक नोटा पडताळणी यंत्रांचा वापर करीत आहे. रिझर्व्ह बँकेने ११.३४ अब्ज नोटांची पडताळणीही केली आहे. या नोटांचे मूल्य १०.९१ लाख कोटी आहे.

बंद करण्यात आलेल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या ज्या नोटा बँकांत जमा झाल्या होत्या, त्यांची विल्हेवाट अजूनही लावली गेलेली नाही. खरे म्हणजे अजूनही या नोटांची मोजणीच सुरू आहे. त्यामुळे नव्या नोटा ठेवायला ना व्यावसायिक बँकांकडे जागा आहे, ना रिझर्व्ह बँकेकडे.

Web Title: New banknotes have been cut, the Reserve Bank decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.