lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नकारात्मकतेमुळे बाजारामध्ये घट

नकारात्मकतेमुळे बाजारामध्ये घट

अमेरिकेत पॅकेज न मिळण्याची शक्यता यामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण राहिले. परिणामी भारतामधील शेअर बाजारही खाली आलेले दिसून आले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:48 AM2020-08-17T01:48:00+5:302020-08-17T01:48:04+5:30

अमेरिकेत पॅकेज न मिळण्याची शक्यता यामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण राहिले. परिणामी भारतामधील शेअर बाजारही खाली आलेले दिसून आले.

Negativity causes a decline in the market | नकारात्मकतेमुळे बाजारामध्ये घट

नकारात्मकतेमुळे बाजारामध्ये घट

- प्रसाद गो. जोशी
भारतामध्ये अन्नधान्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने ग्राहकमूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीमध्ये झालेली वाढ, कमीच राहिलेले औद्योगिक उत्पादन तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका-चीनदरम्यानचा तणाव, अमेरिकेत पॅकेज न मिळण्याची शक्यता यामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण राहिले. परिणामी भारतामधील शेअर बाजारही खाली आलेले दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा प्रारंभ गतसप्ताहात वाढीव पातळीवर झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३८,५५६.२७ ते ३७,६५४.९२ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी मात्र तो खाली आला.
राष्टÑीय शेअर बाजारामध्येही अशीच स्थिती दिसून आली. असे असले तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र वाढ झाली आहे. या दोन्ही निर्देशांकातील अनेक आस्थापनांच्या समभागांचे मूल्य वाढताना दिसून येत आहे. सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी २१३०.३६ कोटी रुपयांची खरेदी करून आपली खरेदी सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये कायम राखलेली दिसून आली. मात्र देशांतर्गत वित्तसंस्थांची विक्री सुरूच आहे. या संस्थांनी गतसप्ताहामध्येही ४४२०.७५ कोटी रुपयांची विक्री केली आहे. चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ११,६२७.१६ कोटी रुपयांची खरेदी केली असली तरी देशी वित्तसंस्थानी ६,५५४.५९ कोटी रुपयांची विक्री केली आहे.
जुलै महिन्यातील देशाच्या अर्थव्यवस्थेचे निदर्शक आकडे जाहीर झाले, मात्र ते बाजाराला दिलासा देणारे नाहीत. चलनवाढीच्या दरामधील वाढ हळूहळू चिंता वाढवत आहे. औद्योगिक उत्पादनमध्ये सलग पाचव्या महिन्यामध्ये घट नोंदविली गेली आहे. यामुळे अर्थव्यस्थेची गाडी रुळावर येण्याला अजूनही काही कालावधी लागण्याची शक्यता स्पष्ट दिसून येत आहे.
७८हजार कोटींहून अधिक भांडवलमूल्य झाले कमी
देशातील सर्वाधिक बाजार भांडवलमूल्य असलेल्या १०
पैकी ६ आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य ७८,२१५ कोटी रुपयांनी घटले आहे.
रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बॅँक, हिदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, कोटक महिंद्र बॅँक या त्या सहा आस्थापना आहेत. चार आस्थापनांचे मूल्य वाढले आहे.
>दृष्टिक्षेपात सप्ताह
निर्देशांक
सेन्सेक्स
निफ्टी
मिडकॅप
स्मॉलकॅप
बंद मूल्य
३७,८७७.३४
११,१७८.४०
१४,४३३.५८
१३,८८८.१८
बदल
-१६३.२३
-३५.६५
+२४१.७१
+१८६.४९

Web Title: Negativity causes a decline in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.