Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!

national consumer helpline : राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर ई-कॉमर्स क्षेत्रासंबंधी सर्वाधिक ८,९१९ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. तुमची जर अशीच फसवणूक झाली असेल तर तुम्हीही तक्रार करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:02 IST2025-07-04T16:01:35+5:302025-07-04T16:02:16+5:30

national consumer helpline : राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर ई-कॉमर्स क्षेत्रासंबंधी सर्वाधिक ८,९१९ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. तुमची जर अशीच फसवणूक झाली असेल तर तुम्हीही तक्रार करू शकता.

national consumer helpline refund 7 crore 2 months 2025 | ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!

national consumer helpline :ऑनलाइनखरेदी (ई-कॉमर्स) करताना फसवणूक झाली किंवा तुमचे पैसे अडकले, तर आता काळजी करण्याची गरज नाही. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) मुळे गेल्या २ महिन्यांत ग्राहकांना ७.१४ कोटी रुपयांचे परतावे (Refunds) मिळाले आहेत! विशेष म्हणजे, यात ई-कॉमर्स कंपन्यांच्या तक्रारींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे, जर तुम्ही एखाद्या ऑनलाइनखरेदीत फसवले गेला असाल, तर कुठे तक्रार करायची हे जाणून घ्या.

ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक तक्रारी
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या २ महिन्यांत परतफेडीच्या दाव्यांशी संबंधित १५,४२६ ग्राहक तक्रारी सोडवल्या आहेत. या तक्रारींमध्ये ई-कॉमर्स क्षेत्रातील तक्रारी सर्वाधिक (८,९१९) होत्या. त्यामुळे, या क्षेत्रातच सर्वाधिक ३.६९ कोटी रुपयांचे परतावे ग्राहकांना मिळाले आहेत. हे आकडे हेच दाखवतात की, हेल्पलाइन किती प्रभावीपणे काम करत आहे.

तुमची फसवणूक झाल्यास इथे करा तक्रार!
जर तुम्हाला ई-कॉमर्स कंपन्यांकडून किंवा इतर कोणत्याही किरकोळ विक्रेत्याकडून फसवणुकीचा अनुभव आला असेल, तर तुम्ही सहजपणे तक्रार दाखल करू शकता.
टोल-फ्री हेल्पलाइन नंबर: तुम्ही १९१५ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून १७ भाषांमध्ये तुमची तक्रार नोंदवू शकता.
ऑनलाइन पोर्टल (INGRAM): 'एकात्मिक तक्रार निवारण यंत्रणा' (INGRAM) द्वारे तुम्ही ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता. हे एक IT-सक्षम केंद्रीय पोर्टल आहे.
इतर पर्याय: तुम्ही व्हॉट्सअॅप, एसएमएस (SMS), ईमेल, एनसीएच ॲप (NCH App), किंवा वेब पोर्टल (consumerhelpline.gov.in) आणि उमंग ॲप (UMANG App) द्वारेही तक्रार करू शकता.

ही हेल्पलाइन ग्राहकांच्या तक्रारी जलद आणि चांगल्या पद्धतीने सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act, 2019) अंतर्गत ग्राहक आयोगावरील भारही कमी होतो.

वाचा - UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग (NCDRC) काय आहे?
राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग (NCDRC) ही भारतातील एक अर्ध-न्यायिक संस्था आहे, जी १९८८ मध्ये स्थापन झाली. ग्राहकांच्या मोठ्या तक्रारी सोडवण्यासाठी ही संस्था काम करते. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश या आयोगाचे प्रमुख असतात.

Web Title: national consumer helpline refund 7 crore 2 months 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.