Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!

मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!

Home Sales Drop : रिअल इस्टेट मार्केटमध्ये मंदी आली असून मालमत्तेच्या वाढत्या किमतीमुळे विक्रीत घट झाली आहे. याचा परिणाम मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये जास्त दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:27 IST2025-07-14T16:01:00+5:302025-07-14T16:27:26+5:30

Home Sales Drop : रिअल इस्टेट मार्केटमध्ये मंदी आली असून मालमत्तेच्या वाढत्या किमतीमुळे विक्रीत घट झाली आहे. याचा परिणाम मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये जास्त दिसत आहे.

Mumbai & Pune Home Sales Drop 30%: Is a Property Price Correction Coming? | मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!

मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!

Home Sales Drop : गेल्या काही वर्षांपासून मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये पूर्वी ४० लाख रुपयांना मिळणारा २ बीएचके फ्लॅट आता १ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र, या वाढलेल्या किमतींचा परिणाम आता दिसू लागला आहे. मालमत्ता बाजारात मंदी परतली असून, घरांची मागणी घटत आहे. याचा थेट परिणाम मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या मालमत्ता बाजारपेठांवरही झाला आहे.

मुंबई-पुण्यात घरांची विक्री ३०% घटली
निवासी ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगरच्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील आठ प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये घरांच्या विक्रीत वर्षानुवर्षे १४ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १,१३,७६८ युनिट्सची विक्री झाली होती, ती यंदा ९७,६७४ युनिट्सवर आली आहे.

या घसरणीचा सर्वाधिक फटका मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुणे या शहरांना बसला आहे. एप्रिल-जून २०२५ मध्ये मुंबई आणि पुण्यातील घरांची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत ३० टक्क्यांनी घसरून ४१,९०१ युनिट्सवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या दोन्ही शहरांमध्ये एकत्रितपणे ६०,१९१ युनिट्सची विक्री झाली होती. याचा अर्थ, वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक घरांपासून दूर जात आहेत.

दिल्ली-एनसीआर आणि इतर शहरांमध्येही घट
फक्त मुंबई आणि पुणेच नाही, तर इतर प्रमुख निवासी बाजारपेठांमध्येही विक्रीत घट झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये घरांच्या विक्रीत ९% घट झाली, तर हैदराबादमध्ये ६% घसरण नोंदवली गेली.

PropTiger.com चे विक्री प्रमुख श्रीधर श्रीनिवासन यांच्या मते, "परवडणाऱ्या किंमतीचा दबाव, विशेषतः बजेट आणि मध्यम उत्पन्न गटांमध्ये, खरेदीदारांच्या भावनांवर परिणाम करत आहे. यामुळेच मालमत्तेची मागणी कमी झाली आहे." रिअल इस्टेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मालमत्तेच्या मागणीतील घट ही फक्त ग्राहकांमुळे नाही, तर गुंतवणूकदारांचाही यात मोठा वाटा आहे. मोठे गुंतवणूकदार आता मालमत्तेपासून अंतर राखत असून, यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता गुंतवणुकीत ३७ टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. अनेक लोक इच्छा असूनही मालमत्ता खरेदी करू शकत नाहीत, कारण किमती त्यांच्या बजेटबाहेर गेल्या आहेत.

नवीन लाँचमध्येही घट
मागणी कमी झाल्यामुळे नवीन गृहप्रकल्पांच्या लाँचमध्येही घट झाली आहे. अहवालात असे नमूद केले आहे की, दुसऱ्या तिमाहीत भू-राजकीय घटकांचा (उदा. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष) मागणीवर परिणाम झाल्यामुळे नवीन पुरवठ्यात तिमाही-दर-तिमाही आणि वर्षानुवर्षे घट झाली आहे. मुंबई, पुणे आणि अहमदाबादमध्ये नवीन प्रकल्पांच्या लाँचमध्ये घट झाली, तर इतर बाजारपेठांमध्ये पुरवठा वाढला.

वाचा - एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

भविष्यात घरं स्वस्त होतील का?
सध्याची बाजारातील परिस्थिती पाहता, घरांच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे मागणी कमी झाली आहे. जेव्हा मागणी कमी होते आणि पुरवठा जास्त असतो, तेव्हा किमती कमी होण्याची शक्यता असते. जर ही मंदी अशीच कायम राहिली आणि नवीन लाँच होणाऱ्या घरांची संख्या कमी झाली, तर बांधकाम कंपन्यांना आपल्या इन्व्हेंटरी (विक्री न झालेल्या घरांचा साठा) कमी करण्यासाठी किमती कमी कराव्या लागू शकतात. त्यामुळे, नजीकच्या भविष्यात विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती स्थिर राहण्याची किंवा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, हा ट्रेंड किती काळ टिकतो आणि बाजाराची एकूण दिशा कशी राहते यावर बरेच काही अवलंबून असेल.

Web Title: Mumbai & Pune Home Sales Drop 30%: Is a Property Price Correction Coming?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.