Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर असावा तर असा; ₹२.८६ कोटींचे झाले तब्बल ₹१००, अल्पावधीत दिला 'छप्परफाड' रिटर्न

शेअर असावा तर असा; ₹२.८६ कोटींचे झाले तब्बल ₹१००, अल्पावधीत दिला 'छप्परफाड' रिटर्न

Multibagger Stock: कंपनी नेमकं काय करते? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:38 IST2026-04-21T14:36:29+5:302026-04-21T14:38:02+5:30

Multibagger Stock: कंपनी नेमकं काय करते? जाणून घ्या...

Multibagger Stock: ₹2.86 crores became ₹100, gave 'big' returns in a short period | शेअर असावा तर असा; ₹२.८६ कोटींचे झाले तब्बल ₹१००, अल्पावधीत दिला 'छप्परफाड' रिटर्न

शेअर असावा तर असा; ₹२.८६ कोटींचे झाले तब्बल ₹१००, अल्पावधीत दिला 'छप्परफाड' रिटर्न

Multibagger Stock: फक्त मोठ्याच नाही, तर लहान/मध्यम कंपन्यांमधील गुंतवणुकीतून मोठे परतावे मिळू शकतात, याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. Monolithic India या कंपनीत केलेल्या प्री-IPO गुंतवणुकीने प्रमोटर प्रभात टेकरीवाल यांना प्रचंड फायदा करून दिला आहे. त्यांच्या सुमारे ₹२.८६ कोटींच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास ₹१०० कोटींवर पोहोचले आहे. 

कसा मिळाला ₹१०० कोटींचा परतावा?

प्रभात टेकरीवाल यांनी कंपनीतील २० लाखांहून अधिक शेअर्स खरेदी केले होते. त्यांनी सरासरी ₹१३.७५ प्रति शेअरने गुंतवणूक केली. हाच शेअर आज सुमारे ₹४९० रुपयांवर पोचोहला आहे. म्हणजेच, या शेअरने तब्बल ३,३९०% परतावा दिला आहे. या गुंतवणूकीसह कंपनीत त्यांची ९.८९% हिस्सेदारी आहे. 

कंपनी काय करते?

२०१८ मध्ये स्थापन झालेली Monolithic India ही खनिज (मिनरल) क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनी ‘रॅमिंग मास’ तयार करते, जो स्टील उद्योगातील इंडक्शन फर्नेससाठी अत्यावश्यक घटक आहे. कंपनीचा दावा आहे की, ती देशातील ८०% पेक्षा जास्त सेकेंडरी स्टील प्लांट्सना पुरवठा करते.

IPO पासून आतापर्यंतचा प्रवास

कंपनीच्या शेअरने लिस्टिंगपासूनच गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या शेअरचा IPO प्राइस बँड ₹१३५ – ₹१४३ होता, तर लिस्टिंग प्राइस ₹२३१.५५ (सुमारे ६२% प्रीमियम) होती. आतापर्यंत या शेअरचा ऑल-टाइम हाय ₹६०७.४० असून, सध्याचा भाव सुमारे ₹४९० आहे.

आता खरेदीची संधी आहे का?

मार्केट तज्ज्ञांच्या मते, स्टॉकने ₹४०० च्या खालील स्तरावरून चांगली रिकव्हरी दाखवली आहे. RSI मध्ये सुधारणा दिसत असून खरेदीदार पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत आहेत. मात्र, ₹४८०-₹५०० हा मजबूत रेजिस्टन्स झोन मानला जात आहे. या पातळीच्या वर टिकाव लागल्यासच पुढील तेजीची शक्यता वाढेल.

गुंतवणूकदारांसाठी रणनीती

या शेअरने कमी कालावधीत मोठा परतावा दिला असला, तरी सध्याचे मूल्यांकन महाग मानले जात आहे. तसेच प्रमोटरची हिस्सेदारी कमी होणे हा सतर्कतेचा संकेत ठरू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाई न करता, स्पष्ट ब्रेकआउटनंतरच नवीन गुंतवणुकीचा विचार करावा.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
 

Web Title : शेयर में उछाल: ₹2.86 करोड़ का निवेश ₹100 करोड़ में बदला!

Web Summary : मोनोलिथिक इंडिया के प्री-आईपीओ निवेश ने प्रमोटर प्रभात टेकरीवाल को भारी रिटर्न दिया। उनका ₹2.86 करोड़ का निवेश बढ़कर ₹100 करोड़ हो गया। स्टॉक, जो शुरू में ₹13.75 पर खरीदा गया था, ₹490 तक पहुंच गया, जिससे 3,390% रिटर्न मिला। विशेषज्ञ उच्च मूल्यांकन का हवाला देते हुए सकारात्मक आरएसआई संकेतों के बावजूद सावधानी बरतने की सलाह देते हैं।

Web Title : Stock Soared: ₹2.86 Crore Investment Turns Into ₹100 Crore!

Web Summary : Monolithic India's pre-IPO investment yielded massive returns for promoter Prabhat Tekriwal. His ₹2.86 crore investment grew to ₹100 crore. The stock, initially bought at ₹13.75, reached ₹490, delivering a 3,390% return. Experts advise caution despite positive RSI signals, citing high valuation.