Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > २ लाख रुपयांचे बनले १ कोटींपेक्षा अधिक! ५०००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

२ लाख रुपयांचे बनले १ कोटींपेक्षा अधिक! ५०००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

Multibagger Stock: शेअर बाजारात जेव्हा घसरण आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, त्याच वेळी एका स्मॉल-कॅप शेअरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. बाजारातील कमकुवत वातावरणातही या शेअरनं जबरदस्त तेजी दाखवली आणि गुंतवणूकदारांसाठी आशेचा नवा किरण ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 15:52 IST2026-01-26T15:51:01+5:302026-01-26T15:52:22+5:30

Multibagger Stock: शेअर बाजारात जेव्हा घसरण आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, त्याच वेळी एका स्मॉल-कॅप शेअरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. बाजारातील कमकुवत वातावरणातही या शेअरनं जबरदस्त तेजी दाखवली आणि गुंतवणूकदारांसाठी आशेचा नवा किरण ठरला.

multibagger stock Mercury EV Tech Rs 2 lakh turned into more than 1 crore More than 5000 percent return do you own this stock | २ लाख रुपयांचे बनले १ कोटींपेक्षा अधिक! ५०००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

२ लाख रुपयांचे बनले १ कोटींपेक्षा अधिक! ५०००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

Multibagger Stock: शेअर बाजारात जेव्हा घसरण आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, त्याच वेळी एका स्मॉल-कॅप शेअरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. आपण बोलत आहोत 'मर्क्युरी ईव्ही-टेक' (Mercury EV-Tech) बद्दल, ज्यानं बाजारातील कमकुवत वातावरणातही जबरदस्त तेजी दाखवली आणि गुंतवणूकदारांसाठी आशेचा नवा किरण ठरला.

५२ आठवड्यांचा उच्चांक

गेल्या शुक्रवारी जेव्हा बाजार सुस्त होता, तेव्हा मर्क्युरी ईव्ही-टेकच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. वाढत्या ट्रेडिंग वॉल्यूमनं या तेजीला मोठा आधार दिला. व्यवहारादरम्यान हा स्टॉक सुमारे १५.५% वधारून ३६.५१ रुपयांवर पोहोचला. मात्र, या तेजीनंतरही हा शेअर आपल्या ८७ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकापासून अजूनही ५८% खाली व्यवहार करत आहे. जानेवारी २०२५ मध्ये गाठलेला हा उच्चांक शेअरमधील अस्थिरता स्पष्ट करतो.

राज्यांवर कर्जाचा मोठा डोंगर; महाराष्ट्र-तामिळनाडू टॉपवर, यूपी-बिहारनं कमी केलं आपल्यावरील ओझं

चढ-उतार आणि ऐतिहासिक परतावा

गेल्या काही महिन्यांत या स्टॉकमध्ये चढ-उतार दिसून आले. हा शेअर अलीकडेच २९.९५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. गेल्या एका वर्षात यात ५८%, सहा महिन्यांत ३०%, तीन महिन्यांत २१% आणि एका महिन्यात ८.५% ची घसरण नोंदवण्यात आली आहे. असं असलं तरी, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर एखाद्या स्वप्नासारखा ठरला आहे.

५ वर्षांत ५०००% पेक्षा जास्त परतावा

मर्क्युरी ईव्ही-टेकनं दीर्घकाळात दिलेला परतावा खऱ्या अर्थाने 'मल्टीबॅगर' ठरला आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरनं ५०००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. याचाच अर्थ असा की, जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी यात १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य ५१ लाख रुपये झाले असते, तर २ लाखांची गुंतवणूक आज १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

आर्थिक आघाडीवर मजबुती

चालू आर्थिक वर्षात कंपनीचे निकालही उत्साहवर्धक राहिले आहेत. दुसऱ्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री ५१% नी वाढून ३४.०१ कोटी रुपये झाली, तर निव्वळ नफा ३५% नं वाढून १.७२ कोटी रुपयांवर पोहोचला. पहिल्या सहामाहीत एकूण विक्रीत १४२% ची वाढ आणि नफ्यातील ४३% ची झेप कंपनीच्या वाढता व्यवसाय दर्शवते.

EV क्षेत्रातील वाढती व्याप्ती

१९८६ मध्ये स्थापन झालेली मर्क्युरी ईव्ही-टेक कंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि रिन्युएबल एनर्जी (Renewable Energy) क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर, कार, बस आणि विशेष ईव्ही उत्पादनांची निर्मिती करते. ईव्ही क्षेत्रातील वाढती मागणी पाहता, हा शेअर येणाऱ्या काळातही गुंतवणूकदारांच्या नजरेत राहू शकतो.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : मर्क्युरी ईवी-टेक: स्मॉल-कैप स्टॉक ने पांच साल में 5000% रिटर्न दिया।

Web Summary : मर्क्युरी ईवी-टेक, एक स्मॉल-कैप स्टॉक, ने शानदार लाभ के साथ बाजार के रुझानों को मात दी। इसने 5 वर्षों में 5000% से अधिक रिटर्न दिया। ईवी क्षेत्र में वृद्धि के कारण कंपनी का वित्तीय प्रदर्शन मजबूत है, हाल की तिमाही में बिक्री और लाभ में वृद्धि हुई है।

Web Title : Mercury EV-Tech: Small-cap stock delivers 5000% returns in five years.

Web Summary : Mercury EV-Tech, a small-cap stock, defied market trends with impressive gains. It gave over 5000% return in 5 years. The company's financials are strong, with increased sales and profit in the recent quarter, driven by growth in the EV sector.