Mukesh Ambani :रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे सुमारे ९.५५ लाख कोटी संपत्तीसह आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्या पाठोपाठ गौतम अदानी (८.१५ लाख कोटी) यांचा क्रमांक लागतो. जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक म्हणून अंबानी त्यांची अलिशान जीवनशैली आणि मोठे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
अंबानींच्या आलिशान कार आणि 'अँटिलिया' बंगल्यामुळे त्यांची जगभरात चर्चा होते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, त्यांच्या मुंबईतील अँटिलिया या घराची किंमत सुमारे १६,६४० कोटी रुपये आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये बुलेटप्रूफ Rolls Royce Cullinan सारख्या कोट्यवधींच्या गाड्या आहेत. अंबानी इतके श्रीमंत आहेत की त्यांनी रोज एक लाख रुपये दान केले तरी त्यांना फरक पडणार नाही. पण, जगातील सर्वात चर्चित धनकुबेरांपैकी एक असलेले मुकेश अंबानी त्यांच्या खिशात काय ठेवतात, याचे उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिले होते. हे उत्तर ऐकून अनेकांना धक्का बसला.
खिशात कॅश किंवा क्रेडिट कार्ड का नाही?
एका मीडिया कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यासाठी पैशाला कधीच महत्त्व नव्हते. पैसा हे फक्त एक संसाधन आहे, जे कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि धोका घेण्यासाठी मदत करते.
हातात पैसे नाही: मुकेश अंबानी म्हणाले की, ते त्यांच्या खिशात कधीही रोकड किंवा क्रेडिट कार्ड ठेवत नाहीत.
दुसरा व्यक्ती करतो बिल पेमेंट: त्यांच्या बाजूला कोणीतरी नेहमी असतो, जो त्यांची बिले भरतो. शाळा-कॉलेजच्या दिवसांपासूनच त्यांनी कधीही स्वतःकडे पैसे घेतले नाहीत किंवा त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नव्हते.
वाचा - सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी संधी! १० वर्षांत १५% परतावा देणारे टॉप ५ गोल्ड फंड्स, पाहा संपूर्ण यादी
साधेपणा आणि मूल्यांवर विश्वास
जरी मुकेश अंबानी हे प्रचंड संपत्तीचे मालक असले तरी, त्यांचे वैयक्तिक जीवन अत्यंत साधे आहे. सार्वजनिकरित्या 'श्रीमंत' किंवा 'धनकुबेर' अशा उपमांनी सन्मानित केलेले त्यांना आवडत नाही, असेही त्यांनी सांगितले.
रोजचा दिनक्रम : त्यांचे साधे राहणीमान, सकाळी लवकर उठणे आणि बाहेर पडण्यापूर्वी आईचा आशीर्वाद घेणे यासारख्या सवयी त्यांना खास बनवतात.
यावरून हे स्पष्ट होते की, मुकेश अंबानींनी भलेही प्रचंड साम्राज्य उभे केले असेल, पण खासगी आयुष्यात ते साधे राहणे पसंत करतात आणि त्यांचे पाय जमिनीवर आहेत.