lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा!

सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा!

जर रिलायन्स आणि डिज्नीची डील पुढे गेली तर ती देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:55 PM2024-01-24T12:55:16+5:302024-01-24T12:56:37+5:30

जर रिलायन्स आणि डिज्नीची डील पुढे गेली तर ती देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनेल.

Mukesh Ambani got a big jackpot because Sony-Zee deal broke Can be a benefit of two billion dollars | सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा!

सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा!

नवी दिल्ली - झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांच्यातील 10 अब्ज डॉलर्सचा करार तुटल्याने मुकेश अंबानी यांना मोठा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने डिस्नी स्टारच्या खरेदीसाठी डील केली आहे. मात्र, झी आणि सोनी यांची डील तुटल्याने डिस्नी स्टारला आयसीसीच्या मेडिया राइट्सकडून मोठे नुकसान होऊ शकते. असे झाल्यास अंबानी त्यांचे व्हॅल्यूएशन दोन अब्ज डॉलर्सपर्यंत कमी करू शकतात.

खरे तर, सोनीसोबतची डील तुटल्यानंतर, झीने आयसीसीसोबत 1.5 अब्ज डॉलरची सब-लायसन्सिग डील पूर्ण करण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की,
आयसीसी टीव्हीसोबत डिस्नी स्टारचा कॉन्ट्रॅक्ट झी आणि सोनीच्या यशस्वी मर्जरवर अवलंबून होता. मात्र, झीच्या या दाव्यावर डिस्नी स्टारने प्रश्न उपस्थित केला आहे. आयसीसी राइट्सच्या बिडिंगमध्ये सहभागी असलेल्या एका दिग्गज मीडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आयसीसी डीलमुले डिश्नी स्टारला 1.5 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिस्नी यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत सहभागी असलेल्या लोकांची सोनी-झी मर्जरवर नजर होती. कारण, आयसीसी टीव्हीची डील याच्याशी संबंधित होती. याचा डिस्नी स्टारच्या व्हॅल्यूएशनसोबत थेट संबंध आहे. अपल्या मीडिया बिझनेसमध्ये डिस्नी स्टारचे मर्जर करण्याची मुकेश अंबानी यांची इच्छा आहे. सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डिस्नी स्टारच्या व्हॅल्यूएशनसाठी दोन सिनेरेयो तयार करण्यात आले होते. यांपैकी एकात आयसीसी टीव्ही राइट्सचा समावेश करण्यात आला होता. तर दुसऱ्यात याचा समावेश करण्यात आला नव्हता. जर डिस्नी स्टारला डिजिटल राइट्सशिवाय आयसीसी टीव्ही डीलही सर्व करावी लागली तर यामुळे कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये दोन अब्ज डॉलरची कमीकेली जाऊ शकते. 

जर रिलायन्स आणि डिज्नीची डील पुढे गेली तर ती देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनेल. मर्जरनंतर तयार होणाऱ्या कंपनीचा कंबाइंड रेव्हेन्यू जवळफास 25,000 कोटी रुपये एढा असेल. सोनी आणि झीने देखील मर्जरनंतर देशातील सर्वात मोठी ब्रॉडकास्टिंग कंपनी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र सोनीने नुकतीच ही डील संपवली. याचबरोबर सोनीने 90 कोटी डॉलर्सची फीसदेखील मागितली आहे. यातच झीने या जपानी कंपनीला न्यायालयात केचण्याची धमकीही दिली आहे. ही डील तुलल्याने मंगळवारी झीचे शेअर जवळफास 31 टक्क्यांनी घसरले आहेत.

Web Title: Mukesh Ambani got a big jackpot because Sony-Zee deal broke Can be a benefit of two billion dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.