lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारमध्ये वाढले विदेशी पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्न

मोदी सरकारमध्ये वाढले विदेशी पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्न

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतात येणाºया विदेशी पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्न ४.१३ लाख कोटींवर पोहोचले आहे. सरकारने असा दावा केला आहे की, मागील तीन वर्षांपासून वाढीचा हा क्रम सुरूच आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 04:19 AM2017-07-26T04:19:13+5:302017-07-26T04:20:40+5:30

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतात येणाºया विदेशी पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्न ४.१३ लाख कोटींवर पोहोचले आहे. सरकारने असा दावा केला आहे की, मागील तीन वर्षांपासून वाढीचा हा क्रम सुरूच आहे

Modi Income from foreign tourists | मोदी सरकारमध्ये वाढले विदेशी पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्न

मोदी सरकारमध्ये वाढले विदेशी पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्न

नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतात येणाºया विदेशी पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्न ४.१३ लाख कोटींवर पोहोचले आहे. सरकारने असा दावा केला आहे की, मागील तीन वर्षांपासून वाढीचा हा क्रम सुरूच आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी सांगितले की, पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून २०१६मध्ये विदेशी चलनाच्या स्वरूपात १.५४ लाख कोटी रुपये, २०१५मध्ये १.३५ लाख कोटी रुपये व २०१४मध्ये १.२३ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे.
पर्यटन मंत्रालय दोन योजनांसाठी निधी देते. बाजार विकास सहकार्य आणि विदेशात प्रचार, प्रसाराच्या योजना व अतिथ्यासह संवर्धनाच्या योजना आहेत. गत चार वर्षांत दोन्ही योजनांवर
1309.65
कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
- महेश शर्मा,
केंद्रीय पर्यटन मंत्री
लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, भारतात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अतुल्य ब्रॅण्ड विकसित करण्यात आला आहे. याचा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसार, प्रचार करण्यात येतो. यासाठी प्रिंट, टीव्ही, आउटडोअर आणि आॅनलाइन प्रचार माध्यमांचा उपयोग केला जातो. याशिवाय सोशल मीडियाचाही आधार घेतला जातो. शर्मा यांनी सांगितले की, भारत आणि विदेशात पर्यटन कार्यालयांकडून पर्यटनाला चालना देण्यासाठी मेळे, रोड शो, परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.

Web Title: Modi Income from foreign tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.