lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाइल देणार ३ लाख जॉब्स; उत्पादक कंपन्या क्षमता वाढवणार

मोबाइल देणार ३ लाख जॉब्स; उत्पादक कंपन्या क्षमता वाढवणार

देशाने ९० हजार कोटींच्या मोबाइलची निर्यात केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 06:34 AM2024-02-10T06:34:22+5:302024-02-10T06:37:09+5:30

देशाने ९० हजार कोटींच्या मोबाइलची निर्यात केली आहे. 

Mobile will provide 3 lakh jobs; Manufacturing companies will increase capacity | मोबाइल देणार ३ लाख जॉब्स; उत्पादक कंपन्या क्षमता वाढवणार

मोबाइल देणार ३ लाख जॉब्स; उत्पादक कंपन्या क्षमता वाढवणार

नवी दिल्ली : भारतातील मोबाइल उद्योग सध्या चांगलाच तेजीत आहे. मोबाइल आणि सुट्या भागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात भारतात होऊ लागले आहे. सध्या या उद्योगाने १२ लाख जणांच्या हाताला काम दिले आहे. २०२६ पर्यंत मोबाइल उद्योगातून १५ लाख नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यातील एक तृतीयांश नोकऱ्या प्रत्यक्ष तर उर्वरित अप्रत्यक्ष स्वरूपाच्या असणार आहेत. भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा मोबाइल उत्पादक आहे. २०१४-१५ मध्ये १,५६६ कोटींच्या मोबाइलची निर्यात केली होती. २०२२-२३ पर्यंत देशाने ९० हजार कोटींच्या मोबाइलची निर्यात केली आहे. 

क्षमता वाढवण्यावर भर 
जगप्रसिद्ध ॲपलसोबत करार केलेल्या फॉक्सकॉन, विस्ट्रॉन तसेच डिक्सन टेक्नॉलॉजी या कंपन्या भारतात मोबाइल निर्मिती सुरू करणार आहेत. देशांतर्गत मागणी आणि निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर मोबाइल निर्मिती करावी लागणार आहे. कंपन्यांनी क्षमता वाढविण्यास सुरुवात केली आहे. 

भारतात येण्यास कंपन्या उत्सुक 
ॲपलने भारतात २०२३-२४ या वर्षांत १२ अब्ज डॉलर्स इतके मूल्य असलेल्या मोबाइल हँडसेटची निर्मिती करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. 
गुगलनेही अलीकडेच भारतात पिक्सल स्मार्टफोनची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. विविध सवलती आणि पोषक वातावरण यामुळे नावाजलेल्या मोबाइल उत्पादक कंपन्या भारतात येण्यास रस दाखवित आहेत.

उद्योगांना अनेक सवलती
nसरकारकडून स्थानिक पातळीवर मोबाइल निर्मिती व्हावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. २०२५-२६ पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
nउत्पादन प्रोत्साहन योजनेतून सरकारने उद्योगांना अनेक आर्थिक सवलती दिल्या आहेत. उद्योगाला चालना देण्यासाठी मोबाइलच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात ५ टक्के कपात केली आहे.

Web Title: Mobile will provide 3 lakh jobs; Manufacturing companies will increase capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.