lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकलं, 4 वर्षांनंतर केला असा पराक्रम

मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकलं, 4 वर्षांनंतर केला असा पराक्रम

16 नोव्हेंबर, 2020 नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे की,  मार्क झुकरबर्ग ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या रँकिंगमध्ये टॉप तीनमध्ये पोहोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 07:19 PM2024-04-06T19:19:08+5:302024-04-06T19:19:41+5:30

16 नोव्हेंबर, 2020 नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे की,  मार्क झुकरबर्ग ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या रँकिंगमध्ये टॉप तीनमध्ये पोहोचले आहेत.

Mark Zuckerberg surpasses Elon Musk in wealth, achieves feat after 4 years | मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकलं, 4 वर्षांनंतर केला असा पराक्रम

मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकलं, 4 वर्षांनंतर केला असा पराक्रम

फेसबुकचे फाउंडर मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना मागे टाकले आहे. याच हरोबर झुकरबर्ग आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर, इलॉन मस्क आता चौथ्या स्थानावर घसरले आहेत.

जवळपास 4 वर्षांनंतर टाकलं मागे -
मार्क झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती 187 बिलियन डॉलर एवढी आहे. तर इलॉन मस्क यांची संपत्ती 181 बिलियन डॉलर एवढी आहे. 16 नोव्हेंबर, 2020 नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे की,  मार्क झुकरबर्ग ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या रँकिंगमध्ये टॉप तीनमध्ये पोहोचले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस $ 207 अब्ज संपत्तीसह रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. याशिवाय फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती 223 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

यामुळे मस्क यांच्या संपत्तीत घसरण? -
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलोन मस्क यांच्या संपत्तीत $4.52 बिलियनची घट झाली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टेस्लाने परवडणारी इलेक्ट्रिक वाहने (EV) बनवण्याची आपली योजना रद्द केल्याच्या बातमीनंतर टेस्लाचे शेअर घसरले. मात्र, मस्क यांनी हे वृत्त फेटाळले आहे. महत्वाचे म्हणजे, टेस्लाच्या वाहन वितरणातही घट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे इलॉन मस्क यांची संपत्ती घटली असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Mark Zuckerberg surpasses Elon Musk in wealth, achieves feat after 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.