lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चालू वर्ष ठरेल नोेकरदारांसाठी लकी

चालू वर्ष ठरेल नोेकरदारांसाठी लकी

मंदीसदृश्य वातावरण असले, तरी २०१८ हे वर्ष नोकरदारांसाठी ‘लकी’ ठरणार आहे. १० टक्के पगारवाढ सर्वच क्षेत्रात अपेक्षित आहे. सोबतच कंपन्या नवीन भरत्याही करतील, असा अहवाल ‘मर्सर्स’ संस्थेने दिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:35 AM2018-01-15T01:35:26+5:302018-01-15T01:35:32+5:30

मंदीसदृश्य वातावरण असले, तरी २०१८ हे वर्ष नोकरदारांसाठी ‘लकी’ ठरणार आहे. १० टक्के पगारवाढ सर्वच क्षेत्रात अपेक्षित आहे. सोबतच कंपन्या नवीन भरत्याही करतील, असा अहवाल ‘मर्सर्स’ संस्थेने दिला आहे.

 Lucky for the current year | चालू वर्ष ठरेल नोेकरदारांसाठी लकी

चालू वर्ष ठरेल नोेकरदारांसाठी लकी

मुंबई : मंदीसदृश्य वातावरण असले, तरी २०१८ हे वर्ष नोकरदारांसाठी ‘लकी’ ठरणार आहे. १० टक्के पगारवाढ सर्वच क्षेत्रात अपेक्षित आहे. सोबतच कंपन्या नवीन भरत्याही करतील, असा अहवाल ‘मर्सर्स’ संस्थेने दिला आहे.
‘मर्सर्स’ ही औद्योगिक क्षेत्रातील सर्वेक्षण करणारी संस्था आहे. संस्थेने अलीकडेच देशभरातील उद्योगांचा मानधनासंबंधी सर्व्हे केला. त्यामध्ये २०१८ हे वर्ष नोकरदारांसाठी समाधानकारक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालानुसार, २०१८ हे वर्ष २०१६ व २०१७ प्रमाणेच असेल. मात्र, यंदाचे वर्ष अधिक चांगले व सकारात्मक असणार आहे. सर्वच क्षेत्रांमधील नोकरदारांचा पगार सरासरी १० टक्क्यांनी वाढणार आहे. यासोबतच कंपन्या त्यांच्या कार्यालयांमधील कर्मचारीही वाढविण्याच्या विचारात आहेत. २०१७ मध्ये ४८ टक्के कंपन्यांनी कर्मचाºयांची भरती केली होती. २०१८ मध्ये ५५ टक्के कंपन्या अशी नवीन भरती करण्याच्या विचारात आहेत. यामुळेच हे वर्ष बेरोजगारांसाठीही चांगले ठरण्याचा अंदाज आहे. नोकºया वाढणार असल्या, तरी नोकरी व कामाच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन तंत्र, स्वयंचलीकरण, रोबोटिक्स, इंटरनेट आॅफ थिंग्स या क्षेत्रात अमाप कौशल्याला वाव असेल. केवळ एवढेच नाही, तर फार्मा, लॉजिस्टिक्स, नियोजन, विश्लेषण या क्षेत्रातही नवीन पद्धतीच्या तंत्रज्ञानाला वाव असेल, असे ‘मर्सर्स’चे भारत प्रमुख शांती नरेश यांचे म्हणणे आहे.

Web Title:  Lucky for the current year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.