lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > घरगुती गॅस सिलिंडरच्या सप्टेंबरमधल्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या...

घरगुती गॅस सिलिंडरच्या सप्टेंबरमधल्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या...

IOC वेबसाइटवर दिलेल्या किमतीनुसार दिल्लीतील 19 किलो एलपीजी सिलिंडर दोन रुपयांनी स्वस्त झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 08:07 AM2020-09-01T08:07:41+5:302020-09-01T08:08:30+5:30

IOC वेबसाइटवर दिलेल्या किमतीनुसार दिल्लीतील 19 किलो एलपीजी सिलिंडर दोन रुपयांनी स्वस्त झाला आहे.

lpg gas cylinder indane gas bharat gas hp gas price unchanged for september | घरगुती गॅस सिलिंडरच्या सप्टेंबरमधल्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या...

घरगुती गॅस सिलिंडरच्या सप्टेंबरमधल्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या...

नवी दिल्लीः ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर किमतीं(01 सप्टेंबर 2020)मध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यां(एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी)नी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 594 रुपयांवर स्थिर आहे. देशांतर्गत एलपीजी सिलिंडरचे दर अन्य शहरांमध्येही स्थिर आहेत. मात्र, 19 किलोग्रॅम सिलिंडरच्या किमती खाली आल्या आहेत.  IOC वेबसाइटवर दिलेल्या किमतीनुसार दिल्लीतील 19 किलो एलपीजी सिलिंडर दोन रुपयांनी स्वस्त झाला आहे.

जुलैमध्ये 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमती 4 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्याच वेळी दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर जूनमध्ये 11.50 रुपयांनी महागला झाला. तर मेमध्ये तो 162.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन किंमत तपासा (भारतात एलपीजी किंमत 01 सप्टेंबर 2020) - देशातील सर्वात मोठी तेल कंपनी IOCच्या वेबसाइटवर दिलेल्या किमतीनुसार, दिल्लीत सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या गेल्या आहेत. मागील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये ज्या किमती होत्या. त्याच सप्टेंबरमध्ये राहणार आहेत. 


दिल्लीत विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 594 रुपयांवर स्थिर आहे. त्याचप्रमाणे मुंबईत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 594 रुपये आहे. चेन्नईमध्ये दर सिलिंडर 50 पैशांनी घसरून आता 610 रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 पैसे प्रति सिलिंडरमागे वाढ झाली आहे.
-----------------

19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत दोन रुपयांनी घसरून 1133 रुपयांवर आली आहे.
कोलकातामध्ये 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 1198.50 रुपयांवरून 1196.50 रुपयांवर आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 1091 रुपयांवरून 1089 खाली आली आहे.
देशातील चौथ्या क्रमांकाच्या महानगर चेन्नईमध्ये 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 1253 रुपयांवरून घसरून 1250  रुपये प्रति सिलिंडरवर आली आहे.

Web Title: lpg gas cylinder indane gas bharat gas hp gas price unchanged for september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.