lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कुमारमंगलम बिर्ला स्टॅनचार्ट, गोल्डमनमधील बँकर्स आदित्य बिर्ला समूहात

कुमारमंगलम बिर्ला स्टॅनचार्ट, गोल्डमनमधील बँकर्स आदित्य बिर्ला समूहात

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी अमेरिकेतील स्टॅण्डर्ड चार्टर्ड व गोल्डमन सॅक्स या मर्चंट बँकिंग कंपनांमधील बँकर्स आदित्य समूहात भरती करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 03:40 AM2019-08-11T03:40:51+5:302019-08-11T03:42:15+5:30

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी अमेरिकेतील स्टॅण्डर्ड चार्टर्ड व गोल्डमन सॅक्स या मर्चंट बँकिंग कंपनांमधील बँकर्स आदित्य समूहात भरती करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Kumaramangalam Birla Stanchert, Goldman Banker's in Aditya Birla Group | कुमारमंगलम बिर्ला स्टॅनचार्ट, गोल्डमनमधील बँकर्स आदित्य बिर्ला समूहात

कुमारमंगलम बिर्ला स्टॅनचार्ट, गोल्डमनमधील बँकर्स आदित्य बिर्ला समूहात

मुंबई : आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी अमेरिकेतील स्टॅण्डर्ड चार्टर्ड व गोल्डमन सॅक्स या मर्चंट बँकिंग कंपनांमधील बँकर्स आदित्य समूहात भरती करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

स्टॅण्डर्ड चार्टर्डमधील कॉर्पोरेट फायनान्स विभागाचे प्रमुख संदीप अग्रवाल बिर्ला समूहात येणार आहेत. त्यांच्याकडे कंपन्यांची खरेदी/विक्री व विलिनीकरणाची जबाबदारी सोपविण्यात येईल. अग्रवाल गेल्या १६ वर्षांपासून स्टॅण्डर्ड चार्टर्डमध्ये कार्यरत होते. ते बिर्ला समूहातून ग्रासीम इंडस्ट्रीजचे मुख्य वित्त अधिकारी म्हणून गेलेल्या आशिष अदुफिया यांची जबाबदारी सांभाळतील.

याचबरोबर गोल्डमन सॅक्समधील वित्त विभागाचे कार्यकारी संचालक मनीष डबीर हेसुद्धा आदित्य बिर्ला समूहात गेल्याच महिन्यात आले आहेत. सिमेंटचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या आदित्य बिर्ला समूहाने गेल्या वर्षी आपला मोबाईल फोन व्यवसाय आयडिया सेल्युलरची व्होडाफोनशी हातमिळवणी केली. याशिवाय अडचणीत आलेल्या छोट्या सिमेंट कंपन्यांना विकत घेणेही आदित्य बिर्ला समूहाने सुरू केले आहे. गेल्याच वर्षी समूहाने अमेरिकेतील अ‍ॅल्युमिनियम उत्पादक कंपनी अलेरिस कॉर्पोरेशन २.६० अब्ज (रु. १८,२०० कोटी) देऊन खरेदी केली.

१ लाख २0 हजार कर्मचारी
कुमारमंगलम बिर्ला भारतातील ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून, त्यांचे संपत्तीमूल्य ५.८० अब्ज डॉलर्स (३९,२०० कोटी रुपये) आहे. आदित्य बिर्ला समूह अ‍ॅल्युमिनियम, सिमेंट, टेक्सटाईल्स, मोबाईल फोन व वित्तीय सेवा क्षेत्रात काम करते व १.२० लाख लोकांचा पोशिंदा आहे.

Web Title: Kumaramangalam Birla Stanchert, Goldman Banker's in Aditya Birla Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.