lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बापरे! १ तोळं सोनं खरेदी करण्यासाठी पाकिस्तानात ‘इतके’ पैसे मोजावे लागतील, ऐकुन घाम फुटेल

बापरे! १ तोळं सोनं खरेदी करण्यासाठी पाकिस्तानात ‘इतके’ पैसे मोजावे लागतील, ऐकुन घाम फुटेल

पाकिस्तानच्या डेलीन्यूज वेबसाईटनुसार, जर तोळ्याचा भाव काढला तर याठिकाणी २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १६ हजार रुपये इतके आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:52 PM2021-11-03T14:52:21+5:302021-11-03T14:53:11+5:30

पाकिस्तानच्या डेलीन्यूज वेबसाईटनुसार, जर तोळ्याचा भाव काढला तर याठिकाणी २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १६ हजार रुपये इतके आहेत.

Know gold rates in Pakistan you have to pay more than one lakh rupees for 10 grams gold | बापरे! १ तोळं सोनं खरेदी करण्यासाठी पाकिस्तानात ‘इतके’ पैसे मोजावे लागतील, ऐकुन घाम फुटेल

बापरे! १ तोळं सोनं खरेदी करण्यासाठी पाकिस्तानात ‘इतके’ पैसे मोजावे लागतील, ऐकुन घाम फुटेल

सोनं म्हणजे प्रत्येकाला आवडणारी वस्तू. भारतात सणाच्या निमित्ताने सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी होते. भारतातील सोन्याचे दर तुम्हाला माहितीच असतील. दरदिवशी सोन्याच्या दरात चढ-उतार होत असतात. आता सोन्याचे दर रेकॉर्ड दरापेक्षा कमी आहेत. परंतु भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानात सोन्याचे दर किती आहेत? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

पाकिस्तानात सोन्याचे दर खूप जास्त आहेत. याठिकाणी तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी १ लाखाहून अधिक रक्कम खर्च करावी लागू शकते. पाकिस्तानात कॅरेटच्या आधारे सोन्याचे दर निश्चित केले जातात. ज्यात २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेटचा समावेश आहे. त्याचसोबत पाकिस्तानात तोळा, प्रति ग्रॅम आणि १० ग्रॅम आधारावर सोन्याचे दर आहेत. याठिकाणी १० ग्रॅमचा एक तोळा नसतो कारण १ तोळ्याचा दर १० ग्रॅमपेक्षा अधिक आहे.

पाकिस्तानच्या डेलीन्यूज वेबसाईटनुसार, जर तोळ्याचा भाव काढला तर याठिकाणी २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १६ हजार रुपये इतके आहेत. जर २२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ६ हजार ३३३ इतके आहेत. तर २४ कॅरेटचे १० ग्रॅम सोने खरेदीसाठी तुम्हाला ९९ हजार ४५० रुपये मोजावे लागतील. २२ कॅरेट १० ग्रॅमसाठी ९१ हजार १६२ रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचं १ ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी ९ हजार ९४५ रुपये द्यावे लागतील. याठिकाणी २२ कॅरेटचं १ ग्रॅम सोनं ९ हजार ११६ रुपयांना मिळतं. भारतीय १ रुपयाची किंमत पाकिस्तानच्या २.२९ रुपयांइतकी आहे.

Web Title: Know gold rates in Pakistan you have to pay more than one lakh rupees for 10 grams gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.