lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > किरण मुुजुमदार-शॉ यांना इन्फोसिसकडून ९.५० लाख दंड

किरण मुुजुमदार-शॉ यांना इन्फोसिसकडून ९.५० लाख दंड

मुंबई : विख्यात महिला उद्योगपती व बायोकॉन लिमिटेड या बॉयोटेक्नॉलॉजी कंपनीच्या अध्यक्षा व प्रबंध संचालक किरण मुजुमदार-शॉ यांना इन्फोासस ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:47 AM2019-03-02T05:47:15+5:302019-03-02T05:47:17+5:30

मुंबई : विख्यात महिला उद्योगपती व बायोकॉन लिमिटेड या बॉयोटेक्नॉलॉजी कंपनीच्या अध्यक्षा व प्रबंध संचालक किरण मुजुमदार-शॉ यांना इन्फोासस ...

Kiran Mujumdar-Shaw 9.5 million fine from Infosys | किरण मुुजुमदार-शॉ यांना इन्फोसिसकडून ९.५० लाख दंड

किरण मुुजुमदार-शॉ यांना इन्फोसिसकडून ९.५० लाख दंड

मुंबई : विख्यात महिला उद्योगपती व बायोकॉन लिमिटेड या बॉयोटेक्नॉलॉजी कंपनीच्या अध्यक्षा व प्रबंध संचालक किरण मुजुमदार-शॉ यांना इन्फोासस टेक्नॉलॉजीने कंपनीचे १६०० समभाग परवानगी न घेता विकले म्हणून ९.५० लाख दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम किरण मुजुमदार शॉ यांना एखाद्या धर्मादाय संस्थेला दान करायची आहे.


मुजुमदार-शॉ या इन्फोसिसच्याही प्रमुख स्वतंत्र संचालक (लीड इंडिपेंडंट डायरेक्टर) आहेत. त्यामुळे त्यांना इन्फोसिसचे समभाग विकायचे असतील तर व्यवस्थापनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. नाही तर ते इनसायडर ट्रेडिंग ठरते. हा नियम किरण मुुजुमदार-शॉ यांचे शेअर बाजारातील व्यवहार सांभाळणाऱ्या कंपनीला बहुधा माहीत नसावा. त्यामुळे त्यांनी मुजुमदार-शॉ यांच्या मालकीचे १६०० समभाग इन्फोसिसची परवानगी न घेताच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये विकून टाकले. विशेष म्हणजे या व्यवहाराबाबत मुजुमदार-शॉ या पूर्णत: अनभिज्ञ होत्या. इनसायडर ट्रेडिंग नियमांचा भंग झाल्याने मुजुमदार-शॉ यांना इन्फोसिस व्यवस्थापनाने ९.५० लाख दंड ठोठावून ती रक्कम एखाद्या धर्मादाय संस्थेला दान करावी, असा आदेश दिला आहे.

Web Title: Kiran Mujumdar-Shaw 9.5 million fine from Infosys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.