lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > केडीएमसीत शिपाई झाले लिपीक २२ कर्मचार्‍यांना पदोन्नत्या

केडीएमसीत शिपाई झाले लिपीक २२ कर्मचार्‍यांना पदोन्नत्या

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिपाई संवर्गातील २२ कर्मचार्‍यांना लिपीकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील काही जणांना तब्बल ३२ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बढती मिळाली आहे. या कर्मचार्‍यांना दहावी इयत्ता उत्तीर्ण, मराठी आणि इंग्रजी टायपिंग, एमएससीआयटी प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि संबंधित शासकीय आरक्षणाच्या निकषानुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे.

By admin | Published: August 21, 2014 09:45 PM2014-08-21T21:45:39+5:302014-08-21T21:45:39+5:30

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिपाई संवर्गातील २२ कर्मचार्‍यांना लिपीकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील काही जणांना तब्बल ३२ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बढती मिळाली आहे. या कर्मचार्‍यांना दहावी इयत्ता उत्तीर्ण, मराठी आणि इंग्रजी टायपिंग, एमएससीआयटी प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि संबंधित शासकीय आरक्षणाच्या निकषानुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे.

KDMT has been promoted to LPIC 22 employees | केडीएमसीत शिपाई झाले लिपीक २२ कर्मचार्‍यांना पदोन्नत्या

केडीएमसीत शिपाई झाले लिपीक २२ कर्मचार्‍यांना पदोन्नत्या

्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिपाई संवर्गातील २२ कर्मचार्‍यांना लिपीकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील काही जणांना तब्बल ३२ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बढती मिळाली आहे. या कर्मचार्‍यांना दहावी इयत्ता उत्तीर्ण, मराठी आणि इंग्रजी टायपिंग, एमएससीआयटी प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि संबंधित शासकीय आरक्षणाच्या निकषानुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे.
लिपीकपदावर बढती मिळालेल्या २२ जणांमध्ये ६ महिला कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांमधील तानाजी चौधरी आणि साईनाथ लोखंडे हे दोघे जण सन १९८२ पासून म्हणजेच कल्याण महापालिकेच्या स्थापनेच्या एक वर्ष आधीपासून सेवेत आहेत. परंतु, त्यांना शिपाईपदावरून लिपीकपदी बढती मिळण्यासाठी तब्बल ३२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी वारसा हक्काची प्रलंबित प्रकरणे नुकतीच निकाली काढली असताना पदोन्नती दिल्याने कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. लिपीकपदाच्या रिक्त जागांवर संबंधित कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. मागील वर्षी प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात ८८ लिपिकांना बढती दिली होती.
(प्रतिनिधी/ प्रशांत माने)
--------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: KDMT has been promoted to LPIC 22 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.