lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio ला BSNL ची टक्कर; केवळ १५० रूपयांत ८१ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य सुविधा

Jio ला BSNL ची टक्कर; केवळ १५० रूपयांत ८१ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य सुविधा

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळत आहेत जबरदस्त सुविधा.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 08:22 PM2021-11-04T20:22:43+5:302021-11-04T20:23:19+5:30

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळत आहेत जबरदस्त सुविधा.

Jio to BSNL; 81 GB data, unlimited calling and other facilities for just Rs | Jio ला BSNL ची टक्कर; केवळ १५० रूपयांत ८१ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य सुविधा

Jio ला BSNL ची टक्कर; केवळ १५० रूपयांत ८१ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य सुविधा

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) अनेकदा ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन्स लाँच करत असते. BSNL चा असाच एक प्लॅन आहे, जो Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea या कंपन्यांवर भारी पडत आहे. महिन्याला सरासरी १५० रूपयांचं रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीनं ४२९ रूपयांचा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन ८१ दिवसांच्या वैधतेसह येतो. ग्राहकांना यानुसार सरासरी १५० रूपयांचं रिचार्ज करावं लागेल.

बीएसएनएलच्या ४२९ रूपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा ऑफर केला जातो. याशिवाय त्यात अनलिमिटेड कॉलिंगसह काही मोफत सुविधाही देण्यात येतात. जवळपास ३ महिन्यांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनची किंमत महिन्याला सरासरी १५० रूपये इतकी आहे.

या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी या हिशोबानं ८१ जीबी डेटा देण्यात येतो. डेली कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी करून ४० केबीपीएस करण्यात येतो. याशिवाय या प्लॅनसह ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगही देण्यात येतं. यासोबत ग्राहकांना मोफत एसएमएसची सुविधाही देण्यात येते. ४२९ रूपयांच्या या प्लॅनमध्ये अनेक OTT प्लॅटफॉर्म्सचीदेखील सुविधा मिळते. Eros Now चं मोफत सबस्क्रिप्शन या प्लॅनसह देण्यात येतं. परंतु याचा वापर केवळ मोबाईलवरच करता येणार आहे. शिवाय दिल्ली, मुंबईतही मोफत रोमिंग सुविधा देण्यात येते.

Web Title: Jio to BSNL; 81 GB data, unlimited calling and other facilities for just Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.