lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इन्फोसिसच्या नफ्यात वाढ

इन्फोसिसच्या नफ्यात वाढ

इन्फोसिसला २०१७-१८ मध्ये १६,०२९ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात ११.७ टक्के वाढ झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:30 AM2018-04-14T01:30:38+5:302018-04-14T01:30:38+5:30

इन्फोसिसला २०१७-१८ मध्ये १६,०२९ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात ११.७ टक्के वाढ झाली.

Infosys's profit growth | इन्फोसिसच्या नफ्यात वाढ

इन्फोसिसच्या नफ्यात वाढ

बंगळुरू : इन्फोसिसला २०१७-१८ मध्ये १६,०२९ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात ११.७ टक्के वाढ झाली. याच काळात कंपनीचा महसूल फक्त ३ टक्क्यांनी वाढला. मागील तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीतील नफ्यात २८.१ टक्क्यांची घट झाली. कंपनीच्या संचालक मंडळाने तिसऱ्या तिमाहीसह वार्षिक निकाल घोषित केले.
इन्फोसिसने भागधारकांना ३०.५० रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. येत्या आर्थिक वर्षात महसुलात ६ ते ८ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे. निकाल नकारात्मक येण्याच्या शक्यतेने इन्फोसिसच्या समभागात दिवसभर चढ-उतार होते. सकाळच्या सत्रात ११७४.५० रुपयांवर उघडलेले समभाग ११८४ रुपयांवर गेले. त्यानंतर तिमाहीतील नफ्यात घट झाल्याचे दिसून आल्याने समभाग घसरून ११६९वर बंद झाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Infosys's profit growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.