lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाइन व्यवहारांत भारतीय सर्वात हुशार, पाहा काय आहे एमएफए?

ऑनलाइन व्यवहारांत भारतीय सर्वात हुशार, पाहा काय आहे एमएफए?

‘एमएफए’ घेण्याच्या आणि वापराच्या बाबतीत भारत जगात सर्वाधिक आघाडीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:13 PM2022-09-30T13:13:00+5:302022-09-30T13:13:23+5:30

‘एमएफए’ घेण्याच्या आणि वापराच्या बाबतीत भारत जगात सर्वाधिक आघाडीवर आहे.

Indians smartest in online transactions see what is MFA whats in report | ऑनलाइन व्यवहारांत भारतीय सर्वात हुशार, पाहा काय आहे एमएफए?

ऑनलाइन व्यवहारांत भारतीय सर्वात हुशार, पाहा काय आहे एमएफए?

मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच ‘एमएफए’ घेण्याच्या आणि वापराच्या बाबतीत भारत जगात सर्वाधिक आघाडीवर आहे. ऑफिसच्या बाहेरून काम आणि ‘वर्क फ्रॉम होम’सह ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांमुळे ‘एमएफए’चा वापर वाढत आहे.

काय आहे संशोधनात? 
संशोधन एजन्सी थेल्सच्या म्हणण्यानुसार, या वर्षी भारतात ‘एमएफए’चा वापर १९ टक्क्यांनी वाढला असून, येथे सर्वाधिक ६६ टक्के लोक याचा वापर करत आहेत. तर जगात याचा वापर ५६ टक्के लोक करत आहेत. दुसऱ्या स्थानावर सिंगापूर आहे, जेथे १७ टक्के वाढीसह ६४ टक्के लोक ‘एमएफए’चा वापर करत आहेत.

नेमकी कशी मिळते सुरक्षा? 
एमएफए हे विशेष प्रकारचे सुरक्षा तंत्रज्ञान आहे. यामध्ये खाते (खात्यांमध्ये) लॉग इन करण्यासाठी किंवा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी क्रेडेन्शियल्सची पडताळणी करण्यासाठी अनेक पायऱ्या आणि पद्धतींचा समावेश आहे. ‘जीमेल’मध्ये लॉग इन करण्यासाठी गुगलचे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन हे देखील याचे एक उदाहरण आहे.

रिमोट वर्कर्सची मोठी पसंती
थेल्सच्या अहवालानुसार, जगभरातील ६८ टक्के एमएफए रिमोट वर्कर्स वापरतात. २०२१मध्ये गैर-आयटी कर्मचाऱ्यांमध्ये एमएफएचा कल ३४ टक्के होता, जो यावर्षी ४० टक्के झाला आहे. जगभरातील ८४ टक्के आयटी व्यावसायिकांनी रिमोट वर्कला सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी त्यांच्या सुरक्षा प्रणालीवर विश्वास ठेवला आहे.

सिंगल पासवर्ड क्रॅक करणे सोपे आहे, परंतु मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशनचे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे पासवर्ड सहजपणे क्रॅक होत नाही. त्यामुळे एमएफए हे वैशिष्ट्य आपल्या बँकिंग ॲप्समध्ये वापरले पाहिजे. या फीचरमध्ये यूजरला लॉग इन करण्यासाठी पासवर्डसह फिंगरप्रिंट स्कॅनर, ओटीपी, डेबिट कार्ड नंबर अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, बहु-स्तर सहजपणे तोडता येत नाही.

 

Web Title: Indians smartest in online transactions see what is MFA whats in report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.