lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय नौदलाला मिळाले अत्याधुनिक UAV ड्रोन, Adani डिफेन्सची मोठी कामगिरी

भारतीय नौदलाला मिळाले अत्याधुनिक UAV ड्रोन, Adani डिफेन्सची मोठी कामगिरी

अदानी डिफेन्सने नौदलाला स्वदेशी UAV सुपूर्द केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 03:30 PM2024-01-10T15:30:59+5:302024-01-10T15:31:40+5:30

अदानी डिफेन्सने नौदलाला स्वदेशी UAV सुपूर्द केले.

Indian Navy gets state-of-the-art drone, Adani Defense's big achievement | भारतीय नौदलाला मिळाले अत्याधुनिक UAV ड्रोन, Adani डिफेन्सची मोठी कामगिरी

भारतीय नौदलाला मिळाले अत्याधुनिक UAV ड्रोन, Adani डिफेन्सची मोठी कामगिरी

Adani Group: अदानी ग्रुपची (Adani Group) उपकंपनी असलेल्या अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने बुधवारी स्वदेशी UAV (मानवरहित हवाई वाहन/Unmanned Aerial Vehicle) दृष्टी-10 स्टारलाइनर (Drishti 10 Starliner) ड्रोनचे बुधवारी अनावरण केले. तसेच, हा UAV ड्रोन भारतीय नौदलाकडे सुपूर्द केला. या अनावरण समारंभात भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्यासह नौदलाचे 75 जवान उपस्थित होते.

संबंधित बातमी- 'मोदी है तो मुमकिन है'! भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान: मुकेश अंबानींकडून तोंडभरुन कौतुक

अदानी ग्रुपच्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले की, 'दृष्टी 10 स्टारलाइनर 36 तास टिकून राहणारा, 450 किलो पेलोड क्षमता असलेला अत्याधुनिक इंटेलिजन्स, सर्व्हिलान्स ड्रोन आहे. हा कुठल्याही प्रकारच्या हवामानात काम करण्यास आणि विशिष्ठ भागात उड्डाण करण्यास सक्षम आहे. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार तयार केलेल्या या ड्रोनची आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या प्रयत्नांची हरी कुमार यांनी प्रशंसा केली.

अदाणी एंटरप्रायझेसचे उपाध्यक्ष जीत अदानी म्हणाले की, जमीन, हवा आणि नौदल सीमा ओलांडून पाळत ठेवण्यात या ड्रोनची महत्वाची भूमिका असेल. भारतीय सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यात हे ड्रोन पूर्ण मदत करेल आणि भारताला निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठ बनवेल. भारतीय नौदलाच्या गरजा पूर्ण करू शकल्याचा आम्हाला अभिमान आहे.

Web Title: Indian Navy gets state-of-the-art drone, Adani Defense's big achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.