lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताचं UPI होतंय ग्लोबल, आता 10 देशांमध्ये करता येणार यूपीआय पेमेंट!

भारताचं UPI होतंय ग्लोबल, आता 10 देशांमध्ये करता येणार यूपीआय पेमेंट!

UPI : यूपीआयमुळे विदेशात व्यवहार करण्याचा थेट फायदा भारतीय लोकांना होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:10 PM2024-02-13T12:10:25+5:302024-02-13T12:11:18+5:30

UPI : यूपीआयमुळे विदेशात व्यवहार करण्याचा थेट फायदा भारतीय लोकांना होईल.

india upi goes global top 10 countries where you use upi  | भारताचं UPI होतंय ग्लोबल, आता 10 देशांमध्ये करता येणार यूपीआय पेमेंट!

भारताचं UPI होतंय ग्लोबल, आता 10 देशांमध्ये करता येणार यूपीआय पेमेंट!

नवी दिल्ली : भारतीय पेमेंट सिस्टम यूपीआयला (UPI) देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर चांगले यश मिळत आहे. अलीकडेच मॉरिशस आणि श्रीलंकेमध्ये यूपीआय लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे यूपीआयचा वापर करणाऱ्या देशांची संख्या आता 10 च्या पुढे गेली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात फ्रान्समध्ये यूपीआय सुरू करण्यात आले होते. यामुळे तुम्हाला पॅरिसमधील आयफेल टॉवरची तिकिटे सहज खरेदी करता येऊ शकतात.

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय सेवेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, हिंदी महासागर क्षेत्रातील तीन मित्र देशांसाठी आजचा दिवस खास आहे. मला विश्वास आहे की श्रीलंका आणि मॉरिशसला यूपीआय सिस्टमचा फायदा होईल. तसेच, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी भारतात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. यूपीआय भारतासोबत भागीदारांना एकत्र आणण्याची नवीन जबाबदारी घेत आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले होते.

दरम्यान, यूपीआयमुळे विदेशात व्यवहार करण्याचा थेट फायदा भारतीय लोकांना होईल. कोणत्याही त्रासाशिवाय विदेशात सहज व्यवहार करू शकतीत. यामुळे विदेशी मुद्रा शुल्क देखील कमी होईल, परिणामी देशातील लोकांसाठी विदेशातील व्यवहार स्वस्त होतील.

काय आहे यूपीआय?
यूपीआय ही भारतीय पेमेंट सिस्टम आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने ते विकसित केले आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे पेमेंट करण्यासाठी OTP ची गरज नाही. तुम्ही फक्त पिन टाकून सहज पेमेंट करू शकता.

कोण-कोणत्या देशात सुरु आहे यूपीआय?
भूतान 
मलेशिया
यूएई
सिंगापूर
ओमान
कतार
रशिया
फ्रान्स
श्रीलंका
मॉरिशस

कोणत्या देशात होणर यूपीआय?
एका रिपोर्टनुसार, भारत सरकार इतर देशांमध्ये देखील यूपीआय लाँच करण्यासाठी चर्चा करत आहे. यामध्ये ब्रिटन, नेपाळ, थायलंड, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बहरीन, जपान आणि फिलिपाइन्स या देशांच्या नावांचा समावेश आहे.
 

Web Title: india upi goes global top 10 countries where you use upi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.