Lokmat Money > बिझनेस न्यूज > Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?

Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?

Iran Isreal War: इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धानं मोठं वळण घेतलं आहे. अमेरिकेनं थेट या संघर्षात उडी घेतली आहे आणि इराणच्या तीन प्रमुख अणू तळांवर हल्ला केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 10:18 IST2025-06-23T10:15:43+5:302025-06-23T10:18:53+5:30

Iran Isreal War: इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धानं मोठं वळण घेतलं आहे. अमेरिकेनं थेट या संघर्षात उडी घेतली आहे आणि इराणच्या तीन प्रमुख अणू तळांवर हल्ला केला.

India and China will not allow what Iran to close Strait of Hormuz both are big traders understand america s math behind this | Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?

Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?

Iran Isreal War: इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धानं मोठं वळण घेतलं आहे. अमेरिकेनं थेट या संघर्षात उडी घेतली आहे आणि इराणच्या तीन प्रमुख अणू तळांवर हल्ला केला. यानंतर इराणी संसदेनं धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या स्ट्रेट ऑफ हॉरमुज बंद करण्यास मान्यता दिली. पण अमेरिकेचे पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी हे पाऊल आत्मघातकी ठरेल असं म्हटलं. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांना हे माहित आहे. इराणच्या अणुतळांवर अमेरिका-इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तणाव वाढला आहे. स्ट्रेट ऑफ हॉरमुज 'काही तासांत' बंद केली जाऊ शकते, असा मोठा इशारा इराणनं दिला आहे. लष्करी विश्लेषक आणि सामरिक तज्ज्ञ याबद्दल साशंक आहेत. या मार्गावरून दररोज सुमारे २ कोटी बॅरल कच्च तेल जाते. हे केवळ इराणच्या शत्रूंसाठीच नव्हे, तर चीन आणि भारतासारख्या जवळच्या मित्र देशांसाठीही महत्त्वाचं आहे. 

रुबिन म्हणाले की, हॉरमुझमधून जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या ४४ टक्के कच्चं तेल आशियात जाते, बहुतेक चीनमध्ये आणि काही प्रमाणात भारतात जातं. यामुळे काही काळासाठी व्यत्यय येऊ शकतो, परंतु त्यापलीकडे इराणसाठी हे आत्मघातकी ठरेल. रुबिन यांनी भर दिला की इराण पेट्रोलसह इंधनाच्या गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे. होरमुझ बंद केल्यानं त्यांच्या विरोधकांना त्रास होण्यापूर्वी त्याच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. यामुळे त्यांचे सैन्य आणि अर्थव्यवस्था कमकुवत होईल. यावरून हे स्पष्ट होते की हा धोका लष्करी वास्तवापेक्षा राजकीय देखावा असू शकतो, असंही रुबिन यांनी स्पष्ट केलं.

Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित

चीन सर्वात मोठा खरेदीदार

चीन हा इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि त्यांच्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारत देखील इराणकडून कच्चं तेल खरेदी करतो. या प्रकरणात, चीन शांत पण शक्तिशाली भूमिका बजावू शकतो. हॉरमुझ पूर्णपणे बंद केल्यानं चीनची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येईल. तसंच, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत महत्त्वाचे पुरवठा मार्ग देखील विस्कळीत होतील. चीननं इराणी पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये शियान ते तेहरानपर्यंत नुकत्याच उद्घाटन झालेल्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. हा रेल्वे मार्ग व्यापार मजबूत करण्यासाठी बांधण्यात आला आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित करणारा आणि रसद विस्कळीत करणारा प्रादेशिक संघर्ष चीनच्या हिताचा नाही. या प्रकरणात भारताचीही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे.

इराणकडून धमक्या दिल्या जात असूनही, हॉरमुझ बंद करणं वाटतं तितकं सोपं नाही. यामुळे इराणला फायद्यापेक्षा जास्त तोटा होईल. चीनचा ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत, कच्च्या तेलाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी इराणला त्याच्या प्रतिस्पर्धी आणि मित्र राष्ट्रांकडून दबाव येऊ शकतो.

Web Title: India and China will not allow what Iran to close Strait of Hormuz both are big traders understand america s math behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.