India-America Relation: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी भारत-अमेरिका व्यापार चर्चांवर महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, भारताने अमेरिकेसोबतच्या टॅरिफ चर्चांमध्ये 10 ते 20 टक्क्यांच्या दरम्यानचा टॅरिफ स्तर ठेवणे अधिक योग्य राहील.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50% टॅरिफचा उल्लेख करताना राजन म्हणले, एवढे उच्च टॅरिफ भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य नाही. भारताने आपल्या चर्चांमध्ये वास्तववादी भूमिका घेतली पाहिजे, अन्यथा याचा परिणाम देशाच्या उत्पादन आणि निर्यातीवर होऊ शकतो.
10-20% कर...
ते पुढे म्हणाले, पूर्व आणि दक्षिण आशियातील देशांप्रमाणे भारतानेही स्वतःला स्पर्धात्मक ठेवणे गरजेचे आहे. अमेरिका आणि भारतामधील व्यापार करारात 10-20% टॅरिफ हे आदर्श लक्ष्य असू शकते. पूर्व आशियातील देशांनी सरासरी 19% दरावर करार केले आहेत, तर जपान आणि युरोपने 15%, आणि सिंगापूरने 10% दरावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भारतानेही या मर्यादेत राहणे शहाणपणाचे ठरेल.
मोठे आश्वासन देऊ नका
राजन यांनी जपान आणि युरोपचा दाखला देत भारताला सावध केले की, या करारात असे वायदे करू नका, जे पूर्ण करणे देशासाठी अवघड ठरू शकते. जपान आणि युरोपने मोठे गुंतवणूकविषयक आश्वासने दिली आहेत, पण ती त्यांच्या अर्थव्यवस्थेला तोटा न होता पूर्ण करता येतील का, हा प्रश्न आहे. धोकादायक वचने देऊन अल्पकालीन फायदा मिळवणे हा शहाणपणाचा मार्ग नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
