lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानी ग्रूपला किती कर्ज दिलं तातडीनं माहिती द्या, RBI ची सर्व बँकांना सूचना!

अदानी ग्रूपला किती कर्ज दिलं तातडीनं माहिती द्या, RBI ची सर्व बँकांना सूचना!

RBI on Adani Group Case: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये सातत्याने घट होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:40 PM2023-02-02T12:40:53+5:302023-02-02T12:41:33+5:30

RBI on Adani Group Case: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये सातत्याने घट होत आहे.

How much loan has been given to Adani Group give information urgently RBI instruction to all banks | अदानी ग्रूपला किती कर्ज दिलं तातडीनं माहिती द्या, RBI ची सर्व बँकांना सूचना!

अदानी ग्रूपला किती कर्ज दिलं तातडीनं माहिती द्या, RBI ची सर्व बँकांना सूचना!

RBI on Adani Group Case: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये सातत्याने घट होत आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, अदानीचे शेअर्स जवळपास ५० टक्क्यांनी घसरले आहेत. तर SBI, बँक ऑफ बडोदा, PNB सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्येही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे आरबीआयनंही याकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. बँक नियामक आरबीआयने अदानी प्रकरणात सर्व बँकांकडून अहवाल मागवला आहे. 

अदानी समूहाच्या कंपन्यांना किती कर्ज दिले आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे? अशी विचारणा आरबीआयनं सर्व बँकांना केली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाची माहिती रिझर्व्ह बँकेनं मागवून घेतली आहे. 

अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ रद्द केला आहे. अदानी एंटरप्रायझेसचा हा एफपीओ तब्बल २०,००० कोटी रुपयांचा होता. याचं कारण देताना गौतम अदानी म्हणाले की, बाजारातील अस्थिरता पाहता FPO आणणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही असे बोर्डाला मनापासून वाटत होते. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश आहे. त्यामुळेच आम्ही एफपीओकडून मिळालेली रक्कम परत करणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित व्यवहार समाप्त करणार आहोत.

२०,००० कोटी रुपयांचा हा FPO २७ जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी ओपन करण्यात आला होता आणि पूर्ण सबस्क्राइब झाल्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत बंद झाला होता. देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा एफपीओ होता. 

Web Title: How much loan has been given to Adani Group give information urgently RBI instruction to all banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.