फंडेकर संगीत प्रतिष्ठानचा संगीत समारंभ थाटातपणजी : पंडित तुकारामबुवा फोंडेकर संगीत प्रतिष्ठान आयोजित 15वा संगीत समारंभ थाटात पार पडला.या वेळी गोमंतकातील नामवंत कलाकार, हौशी नाट्य कलाकार, शास्त्रीय संगीताचे अभ्यासक एकनाथ कोसंबे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शेळवण गावचे प्रसिद्ध व्हायोलिनवादक फिलीप मास्कारेन्हास यांचाही सत्कार करण्यात आला.सत्कारावेळी बोलताना भीकू पै आंगले यांनी कै. तुकारामबुवा फोंडेकरांविषयी काही आठवणी सांगितल्या.या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रसिद्ध रंगकर्मी शवाज नायक म्हणाले, कै. तुकारामबुवा फोंडेकर हे राष्ट्रीय तोडीचे कलाकार होते. हार्मोनियम वादनात त्यांचा हात धरणारा कोणीही नव्हता.कार्यक्रमात खास निमंत्रित म्हणून सांगे मतदारसंघाचे आमदार सुभाष फळदेसाई उपस्थित होते. त्यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या उद्घाटन समारंभानंतर पुण्याचे संजीव मेहेंदळे आणि सावनी दातार, गोव्याचे अक्षय नायक व गौतमी हेदे यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम झाला. त्यांना साथ देण्यासाठी कीबोर्डवर बाळकृष्ण, ऑक्टोपॅडवर विष्णू च्यारी, हँडसोनिकवर विशाल फातर्पेकर व तबल्यावर दयानिधेष कोसंबे यांची साथ होती.डॉ. गुरुदास नाईक यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव दिनेश मणेरकर यांनी अहवाल मांडला. सिद्धी नाईक यांनी आभार मानले. जितेंद्र नाईक यांनी सूत्रसंचालन केले.फोटो ओळी-पं. तुकाराम फोंडेकर संगीत प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे लोकार्पण करताना आमदार सुभाष फळदेसाई, सोबत एकनाथ कोसंबे, भीकू पै आंगले, शिवाजी नायक, फिलिप मास्कारेन्हास, दिनेश मणेरीकर, फॅलीक्स फर्नांडिस, शिवराय फोडेकर व डॉ. व्यंकटेश प्रभुदेसाई.
हॅलो 1- फोंडेकर संगीत प्रतिष्ठानचा संगीत समारंभ थाटात
फोंडेकर संगीत प्रतिष्ठानचा संगीत समारंभ थाटात
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:29+5:302014-08-27T21:30:29+5:30
फोंडेकर संगीत प्रतिष्ठानचा संगीत समारंभ थाटात
