lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ९० रुपयांत विकली मद्य तयार करणारी २६०० कोटींची कंपनी, पाहा का घेतला अवाक् करणारा निर्णय

९० रुपयांत विकली मद्य तयार करणारी २६०० कोटींची कंपनी, पाहा का घेतला अवाक् करणारा निर्णय

या वृत्तानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 02:03 PM2023-08-30T14:03:23+5:302023-08-30T14:05:52+5:30

या वृत्तानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.

heineken sales russia beer business just for 1 euro 90 rs ukraine war impact | ९० रुपयांत विकली मद्य तयार करणारी २६०० कोटींची कंपनी, पाहा का घेतला अवाक् करणारा निर्णय

९० रुपयांत विकली मद्य तयार करणारी २६०० कोटींची कंपनी, पाहा का घेतला अवाक् करणारा निर्णय

जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मद्य उत्पादक कंपनी हेनेकेन आता रशियातून बाहेर (Heineken Sells its Business in Russia) पडण्याच्या विचारात आहे. रशियात हेनेकेन आपला व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाची आणि आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे कंपनीनं रशियातील आपला कोट्यवधींचा व्यवसाय केवळ ९० रुपयांत विकला. या वृत्तानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. हेनेकेननं अर्नेस्ट ग्रुपला आपला व्यवसाय केवळ १ युरोमध्ये विकला.

किती आहे विस्तार
हेनेकेन कंपनीचं रशियात व्हॅल्युएशन (Heineken Sells its Business in Russia) 
जवळपास ३०० मिलियन युरोच्या आसपास आहे. भारतीय रुपयांमध्ये याचं मूल्य २६ अब्ज ८० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. असं असतानाही ही कंपनी केवळ १ युरोत का विकम्यात आली असा प्रश्न उपस्थित होतोय.

रशिया युक्रेन युद्ध आहे कारण
मीडिया रिपोर्ट्सनुसार मूळ नेदरलँडची असलेली हेनेकेननं ही कंपनी या किंमतीत विकण्यामागे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध हे कारण आहे. जेव्हा रशियानं युक्रेनवर हल्ला केला तेव्हाच कंपनी विकण्याचे प्रयत्न केले जात होते. कंपनीला केवळ प्रतीकात्मक रुपात १ युरोमध्ये विकण्यात आलीये. जेणेकरून कंपनीची बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि त्यात कोणत्याही प्रकारची कायदेशीर समस्या येऊ नये हा उद्देश होता. 

युद्धामुळे नुकसान
युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागलं. हेनेकेन  कंपनीचे सीईओ डॉल्फ वॅन डेन ब्रिंक यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीत १८०० कर्मचारी कार्यरत होते. त्यांना तीन वर्षांपर्यंत रोजगाराची हमी देण्यात येईल. सध्या रशियातील स्थिती चांगली नाही. युद्धामुळे केवळ हेनेकेन नाही, तर अन्य कंपन्यांनादेखील नुकसान सोसावं लागत आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या कंपन्या रशियातून बाहेर पडत आहेत.

Web Title: heineken sales russia beer business just for 1 euro 90 rs ukraine war impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.