गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक मोठा निर्णय घेत कंपनीतील 10 टक्के व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. पिचाई यांचा हा निर्णय गुगलच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या "कार्यक्षमता वाढवण्या"च्या प्लॅनिंगचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
सुंदर पिचाई यांनी बुधवारी आयोजित एका ऑल-हॅन्ड्स मिटिंगमध्ये, या निर्णयाचा उद्देश गुगलची कार्यक्षमता दुप्पट करणे, असा असल्याचे कर्मचाऱ्यांसोबत बोलताना म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ही कपात प्रामुख्याने मॅनेजर, डायरेक्टर आणि उपाध्यक्ष पादावर करण्यात आली आहे.
काही लोकांना पुन्हा घेण्यात येणार -
गुगलच्या प्रवक्त्याने बिझनेस इनसाइडरसोबत बोलताना म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यांपैकी काहींना "इंडिव्हिज्युअल काँट्रीब्यूटर" म्हणून पुन्हा भरती करून घेण्यात येणार आहे. तर काहींना पूर्णपणे काढण्यात येणार आहे. अर्थात काही कर्मचारी नव्या पदांवर काम करतील, तर काही पूर्णपणे बाहेर केले जाईल.
या वर्षातील चौथी कर्मचारी कपात -
या वर्षात गुगलने केलेली ही चौथी कर्मचारी कपात आहे. यांपैकी जनवरी महिन्यात गुगलच्या ग्लोबल अॅडव्हर्टाइजमेंट टीममधून सुमारे शंभर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. याशिवाय, कंपनीने जून महिन्यात क्लाउड युनिटमधून 100 जनांना नोकरीवरून काढण्यात आले होते.