lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लागली मोठी लॉटरी! सरकारनं गव्हासह 6 पिकांचा वाढवला MSP 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लागली मोठी लॉटरी! सरकारनं गव्हासह 6 पिकांचा वाढवला MSP 

सरकारने दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी, अर्थात किमान आधारभूत किंमत वाढविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 04:02 PM2023-10-18T16:02:13+5:302023-10-18T16:03:24+5:30

सरकारने दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी, अर्थात किमान आधारभूत किंमत वाढविली आहे.

Good news for farmers, there is a big lottery modi Govt increased MSP of 6 crops including wheat | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लागली मोठी लॉटरी! सरकारनं गव्हासह 6 पिकांचा वाढवला MSP 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लागली मोठी लॉटरी! सरकारनं गव्हासह 6 पिकांचा वाढवला MSP 

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी, अर्थात किमान आधारभूत किंमत वाढविली आहे. कॅबिनेटने MSP मध्ये 2% ते 7% पर्यंतची वाढ करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत सरकारच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

सरकारने गहू आणि मोहरीसह एकूण 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गहू, जव, बटाटा, हरभरा, मसूर, जवस, वाटाणा आणि मोहरी ही मुख्य रब्बी पिके मानली जातात. गव्हाचे किमान आधारभूत किंमत 150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय, मोहरीच्या एमएसपीमध्ये 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

किमान आधारभूत किंमत म्हणजे काय (MSP)? कोण ठरवते?
सरकार शेतकऱ्याच्या पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) अर्थात किमान किंमत निश्चित करत असते. याच किंमतीवर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करत असते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी कोणत्याही परिस्थितीत वाजवी किमान किंमत मिळते. रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून दोनदा कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशींच्या आधारे, दरवर्षी तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि व्यावसायिक पिके यांसारख्या कृषी पिकांसाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये/विभागांचे मत विचारात घेऊन सरकार एमएसपी घोषित करते.

Web Title: Good news for farmers, there is a big lottery modi Govt increased MSP of 6 crops including wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.