Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rate Today: सोन्याच्या दरात ₹३५१५ ची तेजी, पाहा १८ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत

Gold Rate Today: सोन्याच्या दरात ₹३५१५ ची तेजी, पाहा १८ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत

Gold Rate Today: सराफा बाजारात आज सोन्याची चमक पुन्हा एकदा वाढली. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:15 IST2026-02-09T13:13:01+5:302026-02-09T13:15:43+5:30

Gold Rate Today: सराफा बाजारात आज सोन्याची चमक पुन्हा एकदा वाढली. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver price Today Gold price rises by rs 3515 see new price of 18 to 24 carat gold | Gold Rate Today: सोन्याच्या दरात ₹३५१५ ची तेजी, पाहा १८ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत

Gold Rate Today: सोन्याच्या दरात ₹३५१५ ची तेजी, पाहा १८ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत

Gold Rate Today: सराफा बाजारात आज सोन्याची चमक पुन्हा एकदा वाढली. २४ कॅरेट सोन्याचा भाव ३,५१५ रुपयांनी वाढून १,५५,५९३ रुपये प्रति १० ग्रॅम वर उघडला. जीएसटीसह सोन्याची किंमत आता १,६०,२६० रुपयांवर पोहोचली. जरी आज दरात वाढ झाली असली, तरी सोनं अद्याप त्याच्या 'ऑल टाइम हाय' (१,७६,१२१ रुपये) पेक्षा २०,५२८ रुपयांनी स्वस्त आहे. सोन्यासोबतच प्लॅटिनमच्या दरातही ३,११२ रुपयांची उडी पाहायला मिळाली असून तो ६६,८५२ रुपयांवर पोहोचलाय.

कॅरेटनुसार सोन्याचे ताजे दर

'आयबीजेए' (IBJA) नं जाहीर केलेले विविध कॅरेटचे दर खालीलप्रमाणे आहेत:

२३ कॅरेट: ३,५०१ रुपयांच्या वाढीसह १५,४,९७० रुपये (जीएसटीसह: १,५९,६१९ रुपये).

२२ कॅरेट: ३,२२० रुपयांच्या वाढीसह १,४२,५२३ रुपये (जीएसटीसह: १,४६,७९८ रुपये).

१८ कॅरेट: २,६३६ रुपयांच्या वाढीसह १,१६,६९५ रुपये (जीएसटीसह: १,२०,१९५ रुपये).

१४ कॅरेट: २,०५६ रुपयांच्या वाढीसह ९१,०२२ रुपये (जीएसटीसह: ९३,७५२ रुपये).

सरकार जुने एचआरए नियम बदलण्याच्या विचारात! तुमच्या इनहँड सॅलरीमध्ये होऊ शकते मोठी वाढ

फेब्रुवारी महिन्यातील सोन्याची वाटचाल

फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले:

  • १ फेब्रुवारी: सोन्याचा दर १७,०९८ रुपयांनी कोसळून १,४८,६९७ वर आला होता.
  • ३ फेब्रुवारी: २,७८३ रुपयांच्या वाढीसह १,५१,५२९ रुपयांवर पोहोचला.
  • ४ फेब्रुवारी: ५,०९६ रुपयांची मोठी वाढ होऊन दर १,५६,६२५ रुपयांवर गेला.
  • ५ फेब्रुवारी: पुन्हा ४,१२३ रुपयांची घसरण होऊन भाव १,५२,५०२ रुपयांवर स्थिरावला.
     

सोन्यातील या तेजीचं मुख्य कारण काय?

सोन्याच्या दरात झालेल्या या वाढीमागे जागतिक कारणं महत्त्वाची ठरली आहेत. 

१. कमकुवत अमेरिकन डॉलर: डॉलरचा दर ४ फेब्रुवारीनंतरच्या नीचांकी पातळीवर आल्यानं सोन्याच्या किमतीला आधार मिळाला. डॉलर कमकुवत झाल्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी सोनं स्वस्त होतं, ज्यामुळे मागणी वाढते. 

२. जपानमधील राजकीय घडामोडी: जपानमध्ये पंतप्रधान साने ताकाइची यांच्या निवडणूक विजयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येन चलनावरील दबाव वाढला. अशा स्थितीत गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोनं आणि इतर मौल्यवान धातूंना पसंती दिली जात आहे.

Web Title : सोने की कीमतों में ₹3515 की तेजी; 18-24 कैरेट सोने की नवीनतम दरें देखें।

Web Summary : सराफा बाजार में सोने की कीमतों में उछाल आया, 24 कैरेट सोना ₹3,515 बढ़कर ₹1,55,593 प्रति 10 ग्राम हो गया। यह उछाल कमजोर अमेरिकी डॉलर और जापान में राजनीतिक घटनाक्रमों के कारण आया है, जिससे सोने का एक सुरक्षित निवेश के रूप में आकर्षण बढ़ गया है।

Web Title : Gold prices surge ₹3515; check latest rates for 18-24 Carat gold.

Web Summary : Gold prices soared in the bullion market, with 24-carat gold rising by ₹3,515 to ₹1,55,593 per 10 grams. The surge is attributed to a weaker US dollar and political developments in Japan, boosting gold's appeal as a safe investment.