Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान, आजही सोने आणि चांदीच्या किमतीत बदल दिसून येत आहेत. आज सोमवार २३ जून रोजी, २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम १९३ रुपयांनी महाग झालं आणि ते ९८,८८४ रुपयांवर उघडलं. तर, चांदी फक्त २५ रुपयांनी वाढून १०६८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. जीएसटीमुळे, २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम १०१८५० रुपये दराने विकलं जात असताना, चांदी ११०००४ रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर काय आहेत?
आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनं देखील १९२ रुपयांनी महागले आणि ते ९८,४८८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत १७७ रुपयांनी वाढून ९०,५७८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. १८ कॅरेट सोन्याची किंमत देखील १४५ रुपयांनी महागली आणि ती ७४,१६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर झाली. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ११३ रुपयांनी वाढून ५७,८४७ रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत.
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीचे स्पॉट रेट जाहीर केले आहेत. यावर GST चा समावेश नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.
किती वाढली किंमत?
या वर्षी २०२५ मध्ये, सोन्यानं पुन्हा एकदा किमत वाढीच्या बाबतीत चांदीला मागे टाकलं.सराफा बाजारात, या वर्षी सोनं सुमारे २३,१४४ रुपयांनी आणि चांदी २०,७८३ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २४ रोजी सोने ७६०४५ रुपये प्रति १० आणि चांदी ८५,६८० रुपये प्रति किलोनं उघडली. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदी देखील ८६,०१७ रुपये प्रति किलोवर बंद झाली.